नागपुरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 41 वर

नागपूरमध्ये आज 14 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे (Corona patients in Nagpur).

नागपुरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 41 वर
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 4:35 PM

नागपूर : कोरोनाचा विळखा राज्यात दिवसागणिक वाढत चालला आहे (Corona patients in Nagpur). नागपूरमध्ये आज सकाळी 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दुपारी आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 41 वर पोहोचला आहे (Corona patients in Nagpur).

दरम्यान, नागपूरमध्ये आज जे नवे रुग्ण आढळले आहेत त्यांना प्रशासनाकडून अगोदरपासूनच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. हे सर्व रुग्ण दिल्लीच्या मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मरकजच्या कार्यक्रमामुळे राज्यात आणि देशातही कोरोनाचा विळखा वाढल्याचं समोर आलं आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगी जमातच्या मरकजमध्ये कार्यक्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अडीच हजार तब्लिगी एकत्र आले होते. महाराष्ट्रातून तब्बल 1400 तब्लिगी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यापैकी 56 जण नागपूरचे होते. या सर्व तब्लिगींना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, आता यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.

नागपूरमधील अनेक परिसर सील

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. नागपूरमध्ये ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो परिसर पूर्णपणे सील करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देत आहेत.

राज्यात 148 नवे कोरोना रुग्ण, आकडा 1909 वर

ज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर येऊन पोहोचली. आज राज्यात 134 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी सर्वाधिक 113 नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. तर नागपूर 14, मीरा-भायंदरमध्ये 7, पुण्यात 4, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

काल राज्यात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू

काल राज्यात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईचे 12 तर पुणे येथील 2, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 6 महिला आहेत. या 17 मृत्यूंपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, 8 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर 3 जण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 17 पैकी 16 रुग्णांमध्ये (94 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

मुंबईतील 5 स्टार हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोना, हॉटेलमध्ये सरकारी डॉक्टरांचं वास्तव्य

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.