मालेगावात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, बाधितांची संख्या शंभरीपार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona patient increase in malegaon) आहे.

मालेगावात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, बाधितांची संख्या शंभरीपार
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 5:21 PM

मालेगाव : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona patient increase in malegaon) आहे. लॉकडाऊन असूनही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगावमध्येही पहिले 5 रुग्ण 8 एप्रिला आढळले होते. पण आज (23 एप्रिल) मालेगावमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण (corona patient increase in malegaon) झाले आहे.

मालेगावमध्ये आतापर्यंत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगावमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. येथील सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.

तारीख    पॉझिटिव्ह    मृत्यू

8 एप्रिल           05            1 10 एप्रिल         09 12 एप्रिल         29            2 14 एप्रिल         36            2 17 एप्रिल         47            2 18 एप्रिल         63            4 19 एप्रिल         77            6 20 एप्रिल        85             8 21 एप्रिल        94             8 22 एप्रिल       96             10 23 एप्रिल      101           10

आज दुपारपर्यंत मालेगावात 101 कोरोना रुग्ण आढळले असून त्यात 10 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

मालेगाव शहरतील मोमीनपुरा, कमालपुरा, नयापुरा, बेलबाग या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडू हे विभागही सील करण्यात आले आहेत.

मालेगावमध्ये 22 एप्रिल 2020 पर्यंत 365 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. यामधील 230 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालात 96 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 134 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यतिरिक्त 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबत 135 अहवाल अजून प्रलंबित आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 5649 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात 16 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 681 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4257 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.