Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव

कोरोना विषाणूने आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे.

Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव

नाशिक : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने (Corona First Death In Nashik ) आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. येथे 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिकच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 7 वर पोहोचली आहे (Corona First Death In Nashik ).

मालेगावातील 6 जणांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले, तर 1 कोरोना निगेटिव्ह आहे. या पाच जणांपैकी एकाचा काल मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत व्यक्ती ही 51 वर्षीय पुरुष असून ती मालेगांवातील रहिवाशी होती. ते दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा कोविड-19 चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. काल बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली. मात्र, मृत्यूनंतर या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. तसेच, नाशकातील हा पहिला कोरोना (Corona First Death In Nashik ) बळी असल्याने चिंताही वाढली आहे.

राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या 676 मुंबईत आहे. तर पुण्यात कोरोनाचे 155 रुग्ण आहेत. “एक जरी रुग्णाची संख्या वाढली, तरी ती आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून काळजी करणारी गोष्ट आहे. 35 ते 40 दिवसाच्या काळात रुग्णांच्या आकडेवारीत एक मोठी उसळी पाहायला मिळते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील 7 ते 8 दिवस आपले प्रयत्न सुरु राहतील. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र, काही रुग्णांना उपचारानंतर घरीही सोडलं जात आहे. ही समाधानाची बाब आहे”, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल
47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल
52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल
54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल
55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल
56. नागपूर – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
57. मुंबई – 72 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल
58. मुंबई – 48 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल
59. मुंबई – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
60. मुंबई – 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 7 एप्रिल
61. मुंबई – 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
62. मीरा भाईंदर – 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
63. मुंबई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
64. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल
65. पुणे –  44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल
66. पुणे – 55 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
67. नाशिक – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल
68.  मुंबई – 59 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
69. कल्याण – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल
70. मुंबई – 64 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
71. मुंबई – 46 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
72. मुंबई – 54 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
73. रत्नागिरी – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल
74. पुणे- एकूण 14 रुग्णांचा मृत्यू- 9 एप्रिल
75. मुंबई – एकूण 9 रुग्णांचा मृत्यू – 9 एप्रिल
76. मालेगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल

Corona First Death In Nashik

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई92988648725288
पुणे (शहर+ग्रामीण)39125164271097
ठाणे (शहर+ग्रामीण)61869264891646
पालघर 97444817188
रायगड84593731159
रत्नागिरी87060130
सिंधुदुर्ग2572055
सातारा170998168
सांगली59733015
नाशिक (शहर +ग्रामीण)70803847290
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84852420
धुळे151783576
जळगाव 58103336345
नंदूरबार 27914911
सोलापूर39782076344
कोल्हापूर 112380720
औरंगाबाद82174042338
जालना98350647
हिंगोली 3412762
परभणी2001015
लातूर 66432533
उस्मानाबाद 38123414
बीड2201055
नांदेड 57225124
अकोला 1875146892
अमरावती 82361336
यवतमाळ 42428014
बुलडाणा 39920616
वाशिम 1731044
नागपूर2022136621
वर्धा 34141
भंडारा162890
गोंदिया 2101563
चंद्रपूर164960
गडचिरोली115661
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)195031
एकूण2,54,4271,40,32510,289
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *