मी कोविड -19 चाचणी केली, मी  निगेटिव्ह आहे : अमित देशमुख

मी कोरोना टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे (Amit Deshmukh on his Corona Test).

मी कोविड -19 चाचणी केली, मी  निगेटिव्ह आहे : अमित देशमुख

मुंबई : मला खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंगळवारी (7 एप्रिल) मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेतली आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे (Amit Deshmukh on his Corona Test). कोरोना सदृष काही लक्षणांमुळे डॉक्टरांनी खबरदारी म्हणून चाचणी करायला सांगितली होती. यानंतर जे. जे. रुग्णालयातील फिवर क्लिनिकमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी करण्यात आली, असंही त्यांनी नमूद केलं.

अमित देशमुख यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती देखील ठीक असून काळजीचं कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. यावर अमित देशमुख म्हणाले, “आणखी चार दिवस घरुन काम पाहणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये. त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने मी ही चाचणी करून घेतली आहे.”

राज्य शासनाने ठिकठिकाणी फिवर ओपीडी सुरू केली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून कोरोना तपासणीची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन कोरोना तपासणी करून घ्यावी. आजार लवकर लक्षात आल्यास लवकर उपचार करणे आणि लवकर बरे होणे शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढे यावं, असं आवाहन अमित देशमुख यांनी केलं.

आपले आई-वडील, कुटुंब आणि शेजारी यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी आपणाला घ्यायची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग मदतीसाठी तत्परतेने आपल्या सेवेत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आजवर सर्वांनी चांगली साथ दिली आहे. ती यापुढेही सुरू राहिल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात शेवटचा रूग्ण असेपर्यंत कोरोना विरुद्धचा लढा सुरूच राहील, असंही नमूद केलं.


दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून कोविड -19 संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोविड -19 तपासणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. याचा विस्तार आणि व्याप्ती वाढविण्याचे काम सुरू आहे. आपल्यात लक्षणे दिसत असतील, तर कोविड-19 संदर्भातील हेल्पलाईनला संपर्क करा. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चाचणी  करून घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, राज्यात कोरोना रुग्णांची बेरीज, मात्र गुणाकार नाही : राजेश टोपे

Pune Corona Death | पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 24 तासात 5 जणांचा मृत्यू

खासगी असो की सरकारी रुग्णालय, कोरोना चाचणी मोफत करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Amit Deshmukh on his Corona Test

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *