पुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (High Court on Arun Gawli Parole).

पुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (High Court on Arun Gawli Parole). पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे न्यायालयाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सलग 2 वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने अरुण गवळीची यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबतची कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानेच अरुण गवळीला 24 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अरुण गवळीची पत्नी गंभीर आजारी असल्याने न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमधील शिथिलतेसोबतच न्यायालयाने तुरुंगातील आरोपी आणि गुन्हेगारांच्या पॅरोलबाबत कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे. अरुण गवळीला 24 मे रोजी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणं शक्य नसल्याचं सांगत गवळीने न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र यावेळी न्यायालयाने गवळीचा अर्ज फेटाळून लावत पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याचा आदेश दिले.

दरम्यान, अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न लागलं.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या आजारपणाचं कारण, डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर

दगडी चाळीत डॅडीची क्वीनवर नजर, लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा ‘कॅरम’गेम

Lockdown : अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

अरुण गवळीच्या मुलीला हळद लागली, नवरदेवाच्या हातावर मेहंदी

High Court on Arun Gawli Parole

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *