लॉकडाऊनमध्ये विवाह, अरुण गवळीची मुलगी अभिनेत्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत उद्या होणार आहे. (Arun Gawli Daughter Yogita to Marry Actor Akshay Waghmare)

लॉकडाऊनमध्ये विवाह, अरुण गवळीची मुलगी अभिनेत्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळी उद्या (शुक्रवार 8 मे)  विवाहबद्ध होणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (Arun Gawli Daughter Yogita to Marry Actor Akshay Waghmare)

अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असेल. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.

लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. योगिताला आज संध्याकाळी हळद लागणार आहे.

कोण आहे अभिनेता अक्षय वाघमारे?

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.

हेही वाचा : दगडी चाळीत डॅडीची दानत, पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळीची गरजूंना मदत

डॉन अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

लॉकअपमधून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे. काही आठवड्यापूर्वी कॅरम खेळतानाचा त्याचा व्हिडीओ जावई अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला होता.

(Arun Gawli Daughter Yogita to Marry Actor Akshay Waghmare)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *