मेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारताने 137 धावांनी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पुढील सामना जिंकल्यास चार सामन्यांची कसोटी मालिकाही भारतीय संघ खिशात घालेल. 3rd Test. It’s all over! India win by 137 runs …

मेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारताने 137 धावांनी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पुढील सामना जिंकल्यास चार सामन्यांची कसोटी मालिकाही भारतीय संघ खिशात घालेल.

भारताचा दमदार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ‘मॅन ऑफ द मॅच’ किताबाने गौरवण्यात आले. बुमराहने या कसोटी सामन्यात तब्बल 9 विकेट्स खात्यात जमा केल्या.

दिग्गजांच्या यादीत बुमराह

एका वर्षात 75 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहने स्थान मिळवलं आहे. याआधी 1979 साली कपील देव यांनी 76 विकेट्स, पुन्हा 1983 साली कपील देव यांनीच 100 विकेट्स, 2007 साली झहीर खान याने 81 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता जसप्रीत बुमराह याने 2018 साली म्हणजे यंदा 78 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच, 2018 या वर्षात 78 विकेट्स आपल्या खात्यात जमा करुन, जसप्रीत बुमराहने कागिसो रबाडा याचा एका वर्षात 77 विकेट्सचा विक्रमही मोडीत काढला आहे.

विराटची पहिली प्रतिक्रिया

“आमचा विजयरथ इथेच थांबणार नाहीय. मात्र, या विजयामुळे नक्कीच आम्हाला मोठा विश्वास मिळाला आहे. याच विश्वासाने आम्ही सिडनीत सकारात्मक खेळ खेळू”, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली.

गांगुलीच्या बरोबरीत विराट

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या एका विक्रमाची बरोबरी विद्यमान कर्णधार विराट कोहली याने केली आहे. याआधी परदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. म्हणजे सौरव गांगुलीने परदेशात 11 कसोटी जिंकला असून, महेंद्र सिंग धोनी 6 कसोटी जिंकला आहे. विराट सुद्धा 11 कसोटी विजयासह गांगुलीच्या बरोबरीत आहे.

संबंधित बातम्या :

IndvsAus Live: कमिन्सने आजचा पराभव उद्यापर्यंत टाळला

दिवसभरात 15 विकेटस्, मेलबर्न कसोटी रंगतदार स्थितीत

बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता 

IndvsAus: बुमराहचे तोफगोळे, ऑस्ट्रेलिया 151 धावांत कोलमडली 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *