शिरपूर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता, पावरांच्या भाजप प्रवेशाने ठाकूर गटात अस्वस्थता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजल्यानंतर भाजपने (BJP) आयारामांचे मुक्तपणे स्वागत केले आहे.

शिरपूर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता, पावरांच्या भाजप प्रवेशाने ठाकूर गटात अस्वस्थता
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 4:48 PM

धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजल्यानंतर भाजपने (BJP) आयारामांचे मुक्तपणे स्वागत केले आहे. भाजपने नुकताच मुंबई येथे काँग्रेसच्या आमदारांसह त्याच्या कार्यकर्त्यांना प्रवेश (Congress MLA joining BJP) दिला. मात्र, विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ (BJP Supporter Angry) असल्याचं दिसत आहे.

भाजपने नुकताच शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा (Kashiram Pawara) यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. फडणवीसांनी पावरांना विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर केली. या उलट शिरपूरमध्ये भाजपला मोठं करणारे, भाजपचा पाय रोवणारे डॉ. जितेंद्र ठाकूर (Jitendra Thakur) यांना डावललं गेलं आहे. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं आहे.

डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या 9 वर्षांपासून शिरपूरमध्ये भाजपचा पाया मजबूत केला. शिरपूर हा मागील 35 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 मध्ये जितेंद्र ठाकूर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत 74000 मते मिळवली होती. त्यांच्या 9 वर्षांच्या कामाची पावती म्हणून फडणवीस यांनी त्यांना शिरपूर तालुका प्रभारीही केलं होतं.

गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांनी जितेंद्र ठाकूर यांना विधानसभेच्या तिकिटाचे आश्वासनही दिले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांना पक्षात घेऊन भाजपने शिरपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे आता शिरपूर भाजपमध्ये बंड होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी आमचं काय चुकलं या शीर्षका खाली हजारोंच्या संख्येने एकत्र येत चिंतन मेळावा घेतला. त्यात भाजप कार्यकर्त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारीचा भाजपने विचार केला नाही, तर अपक्ष उमेदवारीचे संकेतही यावेळी कार्यकर्त्यांनी दिले. तसेच भाजपने शिरपूर विधानसभा उमेदवारीचा फेरविचार केला नाही, तर शिरपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील असंही सांगण्यात आलं.

भाजप कार्यकर्त्यांनी या चिंतन मेळाव्यात ठाकूर यांना रडू नका, तर लढा म्हणत आर्थिक मदतही देऊ केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील हे अंतर्गत बंड शमणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.