बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा, पोलीस अधीक्षकांची बदली, दोन तपास अधिकारी निलंबित

बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अकोला पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली (Akola SP police transfer) आहे.

बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा, पोलीस अधीक्षकांची बदली, दोन तपास अधिकारी निलंबित
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 10:59 PM

अकोला : बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अकोला पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली (Akola SP police transfer) आहे. तर दोन तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

अकोला शहरातील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कऱ्हाडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे. नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. महिला व मुलींविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.

काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी हरविल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणात त्या ठिकाणच्या तपास अधिकाऱ्यांनी वेगाने तपास केला नाही. तसेच मुलीच्या पालकांना अतिशय अवमानजनक वागणूक दिली. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करुन कडक शब्दात ताशेरे (akola SP police transfer) ओढले.

यानंतर मुलीच्या पालकांनी मंत्रालयात गृहमंत्र्यांना भेटून तपास प्रकरणातील पोलिसांबाबत तक्रार केली. त्यावर गृहमंत्र्यांनी तातडीने सर्व माहिती घेत विभागाच्या अपर मुख्य सचिवांसोबत चर्चा केली.

गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी अकोला शहरातील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कऱ्हाडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे.

इतकंच नव्हे तर महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा राज्यात खपवून घेतला जाणार नाही, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट (akola SP police transfer) केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.