Pune Corona | पुण्यात आणखी काटेकोर प्लॅनिंग, तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था

पुण्यात कोरोनाचे 187 रुग्ण आहेत. तर 26 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावर पुणे महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Pune Corona | पुण्यात आणखी काटेकोर प्लॅनिंग, तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था

पुणे : कोरोना विषाणूने देशात थैमान(Pune Corona Update)  माजवलं आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. मुंबई-पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. पुण्यात कोरोनाचे 187 रुग्ण आहेत. तर 26 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावर पुणे महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबतची माहिती (Pune Corona Update) दिली आहे.

मनपाच्या कोरोना नियोजनाची दखल ‘स्मार्ट सिटी गव्हर्ननन्स’ने घेतली आहे. देशातील चार मुख्य शहरांपैकी पुण्याचं नियोजन अग्रक्रम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मनपा प्रशासन, कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुण्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. काही झोपडपट्टीतला आकडा वाढल्यावर निवडक भाग सील करणार आहोत. पुण्यात 196 रुग्ण ऍडमिट असून त्यापैकी सहा जणांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र, एक आठवड्यात मृत्यूचं प्रमाण कमी होईल”, असं शेखर गायकवाड यांनी सांगितलं.

“कोरोना संदर्भात तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी फक्त ताप, सर्दी, खोकला अशी या केंद्रावर तपासणी होते, दुसऱ्या नायडूसारख्या ठिकाणी व्हेंटिलेटर, डॉक्टर आणि शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात फार क्रिटीकल अशा ससून आणि सिम्बायोसिस रुग्णालय आणि खासगी बेड उपलब्ध आहेत. चार पाच महत्त्वाच्या भागात मृतांचा आकडा (Pune Corona Update) पाचवर गेल्यानंतर मर्यादित स्वरुपात कर्फ्यू लागू करु”, असंही ते म्हणाले.

पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, आकडा 26 वर

पुण्यात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे (Pune Corona patient Died) मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती मूळ अहमदनगरमधील श्रीरामपूर या ठिकाणचा रहिवाशी आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित बळींचा आकडा हा 26 झाला आहे.

पुण्यात कोणत्या रुग्णालयात किती मृत्यू?

  • ससून रुग्णालय – 17
  • जिल्हा रुग्णालय – 1
  • दिनानाथ रुग्णालय – 1
  • नोबेल रुग्णालय – 1
  • जहांगीर रुग्णालय – 1
  • सह्याद्री रुग्णालय – 1
  • नायडू रुग्णालय – 1
  • इनामदार रुग्णालय  – 1
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई396863741279
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
44303689
नवी मुंबई मनपा26738061
कल्याण डोंबिवली मनपा13189125
उल्हासनगर मनपा3316
भिवंडी निजामपूर मनपा134116
मिरा भाईंदर मनपा69915713
पालघर 14413
वसई विरार मनपा87410527
रायगड609518
पनवेल मनपा49921
नाशिक (शहर +ग्रामीण)38728
मालेगाव मनपा74858
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14016
जळगाव 616172
नंदूरबार 353
सोलापूर8974170
सातारा523316
कोल्हापूर 45724
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15011465
जालना1250
हिंगोली 14910
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7330
बीड470
नांदेड 1116
अकोला 5841428
अमरावती 22616
यवतमाळ 130221
बुलडाणा 6283
वाशिम 80
नागपूर5748410
वर्धा 1201
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59015
एकूण67655293292286

Pune Corona Update

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोनाबळींची संख्या 26 वर, कोणत्या रुग्णालयात किती मृत्यू?

दोन परिचारिकांना ‘कोरोना’, दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *