कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी  संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे (Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide).

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 5:52 PM

पुणे : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी  संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे (Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide). भिडे यांनी गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील, असा दावा केला होता. यावरच ब्रिगेड आक्षेप घेतला आहे. तसेच संभाजी भिडे यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का याची तपासणी करा असं म्हणत बोचरी टीका केली.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबत एक निवेदन काढत आपली भूमिका स्पष्ट केली. या निवेदनात म्हटले संभाजी ब्रिगेडने म्हटले, “संभाजी भिडे कोरोना व्हायरसपेक्षा भयानक आहेत. त्यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का हे सांगलीच्या पालकमंत्र्यांनी तपासून घ्यावे. कोरोनाग्रस्तांना बरं करण्यासाठी ‘गोमूत्र आणि तूप खावू घाला’ असं सांगून ते लोकांची फसवणूक करत आहेत. या प्रकरणी संभाजी भिडे या भोंदूविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खरोखरच सरकारने भिडे गुरुजींसारख्या लोकांवर त्वरित कारवाई करावी. कारण कोरोना प्रतिबंध उपायांमध्ये या उपायांची गरज महत्वाची आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे.”

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“गोमूत्र आणि गायीचं तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. गाईच्या तुपाने भरलेला बोट नाकात फिरविला किंवा गाईचे गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांच्या खाण्यापिण्यातसुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा”, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.

“इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा”, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

“चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे. चीन मेला काय, जगला काय बघू नये, चीनशी संबंध तोडावेत. चीनचा हलकटपणा जाईल अस मला वाटत नाही. चीनचा हलकटपणा जायचा असेल, तर चीनवर अत्यंत कठोर पावले उचलली पाहिजेत. चीनला सर्व जीवनावश्यक मार्गाने संपवले पाहिजे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतूद

महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती/संस्था/संघटनांना कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरकारी अधिकारी आणि विभागांकडून अधिकृत माहितीचं प्रसारण करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. याबाबतच्या कोणतीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था/संघटनांविरोधात कायदेशीर कारवाईचीही तरतूद करण्यात आलीआहे.

कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्यांच्या जाहिरातीवर पोलिसांची कारवाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील एका गादी कंपनीने आमच्या गादी वापरल्यास तुम्ही कोरोनापासून बचावला जाल, असा दावा करण्यात आला होता. अरिहंत मॅट्रेस या गादी कंपनीने वर्तमान पत्रात जाहिरात देऊन 15 हजार रुपयात ‘अँटी-कोरोना व्हायरस गाद्या’ घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरात केली होती. यानंतर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे आता वैज्ञानिक आधार नसलेला कोरोनावरील उपाय सांगणाऱ्या संभाजी भिडेंवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.