सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा राग अनावर, जमावाच्या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू

सांगली : भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. यामध्ये ऋचा सुशांत झेंडे या सहा वर्षीय मुलीचा तर ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय 45) यांचा मृत्यू झाला आहे. …

सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा राग अनावर, जमावाच्या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू

सांगली : भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. यामध्ये ऋचा सुशांत झेंडे या सहा वर्षीय मुलीचा तर ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय 45) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सांगली शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हरिपूर रस्ता काळीवाट येथे ऋचा ही तिच्या कुटुंबीयांसोबत राहायची. रात्रीच्या सुमारास ती काका संदीप झेंडे यांच्याबरोबर गाडीवरुन घरी जात होती. काळीवाट चौकात गाडी वळण घेत असताना एक भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये ऋचा गंभीर झाली. चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर ट्रक समोर जाऊन थांबला. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. मात्र, वाहक हा पळू शकला नाही. संतप्त जमावाने वाहकाला ट्रकमधून बाहेर ओढलं, त्याला मारहाण केली. तर काहींनी जखमी ऋचाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ऋचाचा मृत्यू झाल्याचं समजताच जमावाने वाहकाला आणखी मारहाण केली, यानंतर चालक बेशुद्ध पडला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला बाजूला करत जखमी वाहकाला सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *