
बहुतांश लोक शौचाला गेल्यावर येणाऱ्या समस्यांवर बोलण्याचे टाळतात. त्यांना या गोष्टी इतरांसमोर सांगताना लाज वाटते, पण असे करणे चुकीचे आहे. वेळीच डॉक्टरांशी याविषयावर चर्चा केली की कर्करोग होण्याच्या शक्यता कमी होतात. शौचाला गेल्यावर त्रास होत असेल तर कोलोन आणि रेक्टल कर्करोग होण्याची शक्यता असते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की हा आजारपूर्वी प्रामुख्याने वृद्धांना होत होता, पण आजच्या काळात तरुणांमध्येही याची लक्षणे खूप वाढली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्यात हे प्रकरण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजवर नव्हे तर शेवटच्या स्टेजवर येत आहेत.
का उशिरा कळतात याची लक्षणे?
या कर्करोगाचे उशिरा समजण्याचे मुख्य कारण वेदना न होणे हे आहे. खरे तर लोक त्या आजारांना गंभीर समजतात जे शरीरात जास्त वेदना देतात. कोलोरेक्टल कर्करोगात बहुतांश लोकांना वेदना जाणवत नाहीत, उलट मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल जाणवतो. त्याला बहुतांशजण पोट खराब होणे किंवा मूळव्याध समजून दुर्लक्ष करतात. अनेक अभ्यासांनुसार, शौचालयामध्ये होणारा बदल कोलोरेक्टल कर्करोगाच्या सुरुवातीच्या स्टेजचे लक्षण असू शकते.
मलाचा आकार वेगळा असणे
जर तुम्हाला वारंवार मलाचा करताना पेन्सिलसारखा किंवा अतिशय पातळ स्टूल येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा ट्यूमर आपल्या रेक्टम किंवा कोलोनमध्ये वाढते तेव्हा तो मल बाहेर पडण्यात अडथळा आणतो, ज्यामुळे त्यात बदल दिसतो.
मलात म्यूकस जास्त येणे
जेव्हा कोलोनचा बाह्य पृष्ठभाग ट्यूमरमुळे सूजते तेव्हा पॉटी करताना जेलीसारखी रचना किंवा चिकट म्यूकस येतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा.
मलात रक्त येणे
मलात रक्त येण्याने कर्करोगाचा सहज शोध लागतो. खरे तर लोक इतर लक्षणे ओळखू शकले किंवा नाही, पण हे लक्षण दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जातात.
पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे
जर तुमचे पोट वारंवार खराब राहते किंवा तुम्हाला नेहमी बद्धकोष्ठतेच्या समस्या भेडसावत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. या कर्करोगामुळे पोटात अशा प्रकारच्या समस्या येणे खूप सामान्य आहे.
लक्षणे लवकर ओळखा
जर तुम्ही ही लक्षणे वारंवार दुर्लक्षित केलीत तर हा आजार तुमच्या संपूर्ण शरीरात पसरेल. सुरुवातीला लक्षणांचा शोध लागल्यास तुम्ही सहज उपचार करू शकता. शेवटच्या स्टेजमध्ये शरीराला जीवघेण्या प्रक्रियेतून जावे लागते. शिवाय आजाराशी लढण्याची आशाही खूप कमी राहते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि उपचार घ्यावेत)