Acidity Remedy: या तीन योगासनांमुळे मिळेल अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम

| Updated on: Aug 20, 2022 | 7:08 AM

जेव्हा, आपल्या पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होते तेव्हा आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. साधारणपणे, आपण खाल्लेले अन्न शरिरात व्यवस्थित पचण्यासाठी आपल्या पोटात अ‍ॅसिड तयार होते. मात्र, अनेकदा पोटात अ‍ॅसिडचा जास्त स्राव होतो त्यामुळे पोटात गॅस तयार होण्याची समस्या उद्भवते.

Acidity Remedy: या तीन योगासनांमुळे मिळेल अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम
योगासन
Image Credit source: Social Media
Follow us on

Acidity Remedy: गेल्या दोन दशकांमध्ये जीवनशैलीत (Bad Lifestyle) मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शहरी  भागांमध्ये काम करणाऱ्यांचे बाहेर खाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी हौस मौज म्हणून तर कधी नाईलाज म्हणून बऱ्याचदा बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यात येतात. बाहेरच्या अन्नपदार्थामध्ये तेल, मसाले आणि इतर साहित्यांचा दर्जा घरच्यासारखा नक्कीच नसतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटीची (Acidity) समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. अ‍ॅसिडिटी (Acidity remedy) किंवा गॅसची (Gas) समस्या ही पचनाशी संबंधित असलेली एक सामान्य समस्या आहे. जेव्हा, आपल्या पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होते तेव्हा आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. साधारणपणे, आपण खाल्लेले अन्न शरिरात व्यवस्थित पचण्यासाठी आपल्या पोटात अ‍ॅसिड तयार होते. मात्र, अनेकदा पोटात अ‍ॅसिडचा जास्त स्राव होतो त्यामुळे पोटात गॅस तयार होण्याची समस्या उद्भवते.

अ‍ॅसिडिटी होण्यामागचे एक संभाव्य कारण म्हणजे जेवणानंतर लगेच विश्रांती घेणे किंवा झोपी जाणे हे असू शकते. जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही अ‍ॅसिडिटी होऊ शकते. आपल्या आयुष्यात अतिरिक्त ताण येण्यासोबतच या सर्व सवयींमुळे अ‍ॅसिडिटीचा  त्रासही वाढतो. योगासनांच्या सरावातून यावर मात करता येणे शक्य आहे. जाणून घेऊया योगासनांचे प्रकार.

1. वज्रासन

पोटातील गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वज्रासन हे प्रमुख योगासन आहे. या आसनामुळे पोट आणि आतड्यांमधला रक्तप्रवाह वाढतो आणि आपण खाल्लेल्या अन्नाचे चांगल्या प्रकारे पचन होण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला आम्लपित्त, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या होत नाही. तुमची पचनक्रिया कमजोर असेल तर तुम्ही या आसनाचा दररोज सराव करा. तसेच, वज्रासनामुळे आपली पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

2. पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन किंवा फॉरवर्ड बेंड पोझ हे आपल्या पोटातील अवयव निरोगी ठेवण्यासाठीचे एक फायदेशीर योगासन आहे. या योगासनाची मुद्रा केवळ आपल्या अवयवांचे योग्य कार्य करण्यास आणि पचन समस्यांवर उपचार करण्यास मदत करत नाही, तर मासिक पाळीसाठी देखील हे प्रभावी योगासन आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्यास तुमची पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. या योगासनामुळे कंबर, नितंब, हात, खांदे आणि पोटाचा भाग यावर योग्य ताण पडतो आणि आपले रक्ताभिसरण वाढते.

3. बालासन

बालासन ही एक विश्रांतीची मुद्रा आहे. हे योगासन आपल्या पचनसंस्थेला आराम देते आणि अ‍ॅसिडिटीपासून मुक्त होण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा ते तुमच्या पोटातील अवयवांना योग्य प्रकारे ताण देऊन त्यांना मजबूत बनवण्यास मदत करते. बालासन ताण आणि थकवा कमी करून नितंब, मांड्या आणि घोट्याला चांगल्या प्रकारे ताण देते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. कुठलेही आसन करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा)