Health : धूम्रपान, मद्यपान, असुक्षित सेक्समुळे वाढले कर्करोगाचे प्रमाण; ‘द लँसेट जर्नल’चा अहवाल

2019 या वर्षात जगभरात सुमारे 44,50,000 (4.45 मिलियन) लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. आणि त्यांच्या मृत्यूसाठी धूम्रपान, मद्यपान, बीएमआय सारखे धोकादायक घटक अथवा सवयी कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

Health : धूम्रपान, मद्यपान, असुक्षित सेक्समुळे वाढले कर्करोगाचे प्रमाण; 'द लँसेट जर्नल'चा अहवाल
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 12:25 PM

कर्करोग म्हणजेच कॅन्सर (Cancer) हा एक अतिशय धोकादायक आणि बऱ्याच वेळा जीवघेणा ठरणारा आजार आहे. कर्करोग होण्याची बरीच कारणे असू शकतात. मात्र बहुतांश वेळा त्यासाठी धूम्रपान (Smoking), मद्यपान (Drinking) , हाय बॉडी मास इंडेक्स ( बीएमआय) (BMI), तसेच असुरक्षित शरीरसंबंध यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. ‘ द लॅंसेट जर्नल ‘ मध्ये शुक्रवारी पब्लिश झालेल्या एका अभ्यासातून हा खुलासा झाला आहे. 2019 या वर्षात जगभरात सुमारे 44,50,000 (4.45 मिलियन) लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूसाठी धूम्रपान, मद्यपान, बीएमआय सारखे धोकादायक घटक अथवा सवयी कारणीभूत ठरल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये इनस्टिट्युट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्होल्यूशन (IHME)चे डायरेक्टर ख्रिस्तोफर मरे यांनी या अभ्यासाबद्दल माहिती दिली.

कर्करोग हे आपल्या आरोग्यासमोरील एक मोठे आव्हान असून, तो जगभरात वेगाने वाढत आहे, असे या अभ्यासातून दिसून आल्याचे ख्रिस्तोफर यांनी नमूद केले. धूम्रपान हे कर्करोग होण्यामागचे एक सर्वात मोठे कारण आहे, असेही त्यांनी सांगितले. ख्रिस्तोफर हे या अभ्यासाचे सह- लेखक आहेत.

2010- 2019 या वर्षांत वेगाने वाढला कॅन्सर

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, इंज्युरी अँड रिस्क फॅक्टर्स (Global Burden of Disease GBD) 2019 च्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांच्या वापर करून, संशोधकांनी 2019 साली कर्करोगाच्या 23 प्रकारांमुळे होणाऱ्या मृत्यूसाठी 34 वर्तनात्मक, मेटाबॉलिक आणि पर्यावरणातील घटकांचा कसा परिणाम झाला, याची तपासणी केली. या धोकादायक कारणांमुळे 2010 ते 2019 या कालावधीत कॅन्सरचा प्रभाव कसा होता, तो किती वाढला, याचाही अभ्यास करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात 44.50 लाख (4.45 million) लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. 2019 साली कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण 44.4 टक्के एवढा होते. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच असुरक्षित शरीरसंबंध आणि खाण्यापिण्याचा सवयी, या गोष्टीमुंळे जगभरातील लोकांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.