तुला हेच जमत नाही, तू असाच आहेस, पालकांनो, मुलांशी बोलताना सांभाळा!

| Updated on: Sep 29, 2021 | 2:51 PM

प्रत्येकच आई-वडिलांना वाटते की, आपली मुले प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल असावीत. मग ते अभ्यास असो किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार असावेत. अशी देखील आई-वडिलांची इच्छा असते. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आणि त्यांना चांगली शिस्त लागण्यासाठी आई-वडिल आपल्या मुलांना रागवतात.

तुला हेच जमत नाही, तू असाच आहेस, पालकांनो, मुलांशी बोलताना सांभाळा!
मुलांचे मानसिक आरोग्य
Follow us on

मुंबई : प्रत्येकच आई-वडिलांना वाटते की, आपली मुले प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल असावीत. मग ते अभ्यास असो किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार असावेत. अशी देखील आई-वडिलांची इच्छा असते. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आणि त्यांना चांगली शिस्त लागण्यासाठी आई-वडिल आपल्या मुलांना रागवतात. मात्र, मुलांना रागवताना आई-वडिल असे काही शब्द वापरतात. ज्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. (Adverse effects on children’s mental health due to negative comments from parents)

तु तुझ्या भावासारखा का नाहीस?- बऱ्याच वेळा आई-वडिल मुलांना म्हणतात की, तुझ्यापेक्षा तुझा लहान भाऊ\ बहिण हुशार आहे. तु का त्याच्यासारखा हुशार नाहीयेस. असे मुलांना बोलल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कधीही मुलांना असे बोलू नये.

तुला सांगितलेली एकही गोष्ट करता येत नाही- जर तुम्ही तुमच्या मुलाला या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलल्या की, तुला सांगितलेली एकही गोष्ट करता येत नाही. तर त्याच्या मनात अशी भावना येते की, ते काहीही करू शकत नाहीत.

तु जन्माला आला नसता तर बरे झाले असते- अनेकवेळा आई-वडिल मुलांनी काही चुका केल्या तर रागा-रागात म्हणतात की, तु जन्माला आला नसता तर बरे झाले असते. हे मुलांना बोलणे चुकीचे आहे. कारण यामुळे मुलांना अपराधी झाल्यासारखे वाटते.

आपण ही गोष्टी घेऊ शकत नाहीत- बऱ्याच वेळा बाजारामध्ये गेल्यावर मुले एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जिद्द करतात. मात्र, त्यावेळी आई-वडिल म्हणतात की, आपण ही गोष्टी खरेदी करू शकत नाहीत. आपल्याकडे तेवढे पैसे नाहीये. हे आई-वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर देखील मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

लवकर आवर नाही तर तुला घेऊन जाणार नाही- कुठे बाजारात जाताना बऱ्याच वेळा आई-वडिल आपल्या मुलांना म्हणतात की, तु जर लवकर आवरले नाही तर तुला आम्ही सोबत घेऊन जाणार नाहीत. तुला इथेच सोडतो. हे देखील मुलांना बोलले पाहिजे नाही. याचा देखील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

संबंधित बातम्या : 

मुलं हुशार व्हावीत असं वाटतं ना? मग त्यांना आहारात ‘हे’ पदार्थ नक्की द्या…
Kids Health: ‘हे’ 8 सुपर फूड्स लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करा आणि मुलांची उंची वाढवा!

(Adverse effects on children’s mental health due to negative comments from parents)