Benefits of Owning Dog : कुत्रा पाळल्यावर कधीच होणार नाहीत हे 5 आजार, करा फक्त ही एक गोष्ट!

कुत्रा पाळण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. त्यांच्या मालकांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल यांसह अनेक आजार आहेत जे होत नाहीत.

Benefits of Owning Dog : कुत्रा पाळल्यावर कधीच होणार नाहीत हे 5 आजार, करा फक्त ही एक गोष्ट!
Dog death case
Image Credit source: Social Media
| Updated on: May 31, 2023 | 11:01 PM

कुत्रा हा प्राणी सगळ्यात इमानदार प्राणी असतो. तो माणसाचा बेस्ट फ्रेंड असतो. तसेच बहुतेक लोक हे पेट लव्हर्स असतात त्यामुळे ते त्यांच्या घरी आवर्जून कुत्रा हा प्राणी पाळतातच. पण तुम्हाला माहितीये का की कुत्रा पाळल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तर आज आपण याच फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.

हार्वर्ड मेडिकल स्कूलने संशोधनाचा दाखला देत सांगितलं की, कुत्रा पाळण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. त्यांच्या मालकांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी असतो. तसंच हा प्राणी तुम्हाला मानसिक आरोग्यही प्रदान करतो.

1. हृदयविकार ठेवते दूर
पाळीव कुत्रा हा तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तसंच तो हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करतो. भरपूर संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, कुत्रा पाळणाऱ्यांचे कोलेस्ट्रॉल, बीपी सारखे आजार नियंत्रणात राहतात.

2. एकटेपणा जाणवत नाही
सध्याच्या काळात भरपूर जणांना डिप्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते. यामध्ये मग एकटेपणा असेल किंवा एखाद्याला त्याचे प्रेम मिळालं नसेल तर त्याचं मन तुटत आणि डिप्रेशन सारखी समस्या निर्माण होते अशावेळी तुमचा कुत्रा तुमचा एकटेपणा नष्ट करतो. तो सोबत असेल तर तुम्हाला एकटं कधीच वाटणार नाही.

2. तणाव कमी होतो
सध्या लोकांना वाढतं काम आणि जबाबदारी यांमुळे तणाव येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे लोकांना बीपी, दम लागणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. तर अशावेळी तुम्ही पाळलेल्या कुत्र्याला दहा मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा थोपटत रहा यामुळे तुम्हाला सर्व लक्षणांपासून आराम मिळू शकतो.

3. शारीरिक हालचाली वाढतात
आजकाल फिट राहण्यासाठी शारीरिक हालचाल करणं खूप गरजेचे आहे. पण बहुतेक लोक ऑफिस वर्कमुळे शारीरिक हालचाल कमी प्रमाणात करतात. त्यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. तर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्यामुळे तुमच्या शारीरिक हालचाली वाढवू शकता. कारण तो तुम्हाला चालवतो, पळवतो यामुळे तुमची शारीरिक हालचाल आपोआप होते आणि तुमचा फिटनेसही कायम राहतो.

4. नवीन मित्र बनवण्यास मदत करतो
आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल तुमच्याकडे जर पाळीव कुत्रा असेल आणि तुम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन गेला असाल तर त्या कुत्र्याला ब्रेड देण्यासाठी किंवा त्या कुत्र्याला भेटण्यासाठी काही अनोळखी लोकं त्याच्याकडे येतात त्यामुळे तुमच्या देखील कॉन्टॅक्ट वाढतो आणि नवीन लोकांशी मैत्री होते.

कुत्रा पाळताना या गोष्टी ठेवा लक्षात
जर तुम्ही कुत्रा पाळत असाल तर त्याच्यासोबत एक वेगळं आपुलकीचं नातं तयार करा. त्या कुत्र्याला तुम्ही थोडासा वेळ द्या, जेणेकरून तुमच्यातील नातं दृढ होईल. सोबतच त्या कुत्र्याची काळजी देखील घ्या या गोष्टी केल्या तरच कुत्रा तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये मदत करेल.