AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठलं की आवळ्याचं पाणी प्यायचं, का? वाचा

आवळ्याचे पोषणमूल्य पाहता त्याला सुपरफूड असेही म्हणतात. हे सहसा रस, चटणी, भाजी, लोणचे आणि मुरब्बा म्हणून खाल्ले जाते, परंतु आणखी एक मार्ग आहे ज्यामुळे आपण आपल्या शरीराचे आरोग्य सुधारू शकता

सकाळी उठलं की आवळ्याचं पाणी प्यायचं, का? वाचा
Amla juice benefitsImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 18, 2023 | 5:33 PM
Share

आवळ्याचे फायदे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत, त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आवळ्याचे पोषणमूल्य पाहता त्याला सुपरफूड असेही म्हणतात. हे सहसा रस, चटणी, भाजी, लोणचे आणि मुरब्बा म्हणून खाल्ले जाते, परंतु आणखी एक मार्ग आहे ज्यामुळे आपण आपल्या शरीराचे आरोग्य सुधारू शकता. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितले की, रोज सकाळी आवळ्याचे पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल.

आवळ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यात प्रथिने, कार्ब, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तसेच यात साखर नसते, त्यामुळे ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

आवळ्याचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा आवळा पावडर घेऊन ग्लासभर पाण्यात मिसळा, हे लक्षात ठेवा की हे पाणी चमच्याने चांगले ढवळावे लागेल. शेवटी ते फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी पेय म्हणून प्यावे.

आवळ्याचे पाणी पिण्याचे फायदे

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिड असतात, ज्याच्या मदतीने शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला राहतो. त्यामुळे पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होऊ लागते. हेच कारण आहे की आवळ्याचे पाणी वजन कमी करणारे पेय मानले जाते.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा इतर अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. सकाळी उठून आवळ्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करता येते.

आपण अनेकदा ऐकले असेल की आवळ्याचा वापर अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. त्यामुळे सौंदर्य वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. जर तुम्हाला पिंपल्स किंवा सुरकुत्या येण्याची समस्या असेल तर आवळ्याचे पाणी प्या. तसेच मजबूत आणि चमकदार केसांसाठी आवळ्याचा आधार घेता येतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.