पुरुषांपेक्षा भिन्न असतात महिलांच्या किडनी स्टोनची लक्षणं ? प्रत्येक बाब जाणून घ्या

किडनी स्टोनची समस्या आजकाल जगभरातील सर्वात खतरनाक आजारापैकी एक आहे. चला तर पाहूयात पुरुष आणि महिलांमध्ये या आजारातील लक्षणं कोणती असतात.

पुरुषांपेक्षा भिन्न असतात महिलांच्या किडनी स्टोनची लक्षणं ? प्रत्येक बाब जाणून घ्या
Kidney stone pain
| Updated on: Aug 24, 2025 | 8:20 PM

किडनी स्टोन आज काल एक सर्वसामान्य आजार होत चालला आहे. आधी हा आजार पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळायचा आता नव्या संशोधनानुसार यात महिलांमध्ये देखील या आजाराची लक्षणं दिसत आहेत. खास करुन प्रोढ आणि तरुण महिलांमध्ये वेगाने हा आजार पसरत आहे. नॅशनल लायब्ररी आणि मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार आता याचा परिणाम पुरुष आणि महिला यांच्यावर सारखाच होत आहे.

पुरुष आणि महिलांमध्ये दुखणे वेगळे

किडनी स्टोनचे दुखणं अचानक आणि खूप तीव्र स्वरुपाचे असते. ज्याला मेडिकल भाषेत renal colic म्हटले जाते. हे दुखणे नेहमी कमरेच्या आजूबाजूला सुरु होऊन पोट आणि ओटीपोटापर्यंत पसरते.

पुरुष : पुरुषांमध्ये हे दुखणं जास्त करुन कंबर, पाठ आणि ग्रोईनमध्ये होते. जेव्हा स्टोन युरेटरमध्ये जातो तेव्हा दुखणे टेस्टीकल्स आणि स्क्रोटमपर्यंत जाणवू लागते.

महिला : महिलांमध्ये हे दुखणं जास्त करुन ओटी पोट आणि पेल्विसवर होते. अनेकदा हे दुखणं स्री रोगाशी संबंधित दुखण्यासारखे वाटते.

महिलांमध्ये सर्वाधिक

अभ्यासानुसार 40 वयोगटाच्या पेक्षा कमी वयाच्या महिलांना किडनी स्टोनचा परिणाम जास्त गंभीर असतो. त्यांना थकवा, झोपेची कमरता आणि चिंता ( एंग्जाईटी ) त्रास सर्वाधिक होत असतो. तसेच मेनोपॉझच्यानंतर हार्मोनल बदलामुळे दुखणे वेगळ्या प्रकारे जाणवू शकते. याशिवाय महिलांना किडनी स्टोनशी संबंधित सर्जरी वा शॉकव्हेव ट्रीटमेंट (lithotripsy) नंतर sepsis म्हणजे इन्फेक्शनचा धोका पुरुषांच्या तुलनेत जास्त असतो.

हार्मोन आणि लाईफस्टाईलच्या परिणाम

हार्मोन्सचा देखील किडनी स्टोनमध्ये सर्वात मोठी भूमिका असते. प्री-मेनोपॉजल महिलांमध्ये estrogen हार्मोन खडे बनण्यापासून बचाव करतात. परंतू वय वाढल्यानंतर हे संरक्षण कमी होते.तर पुरुषांत जास्त घाम येत असल्याने लघवीत कॅल्शियम आणि ऑक्सलेट जास्त असल्याने किडनीत वारंवार खडे होण्याची शक्यता असते.

जीवनावर परिणाम

किडनी स्टोनचे दुखणं प्रत्येकासाठी कठीण असते. परंतू महिलांमध्ये याचा परिणमा त्यांच्या जीवनावर अधिक पडतो. थकवा, झोपेची कमरता आणि चिंता त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाला प्रभावित करु शकते.

किडनी स्टोनपासून बचावाचे उपाय

किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी आपली डाएट आणि लाईफस्टाईलवर लक्ष द्यायला हवे, रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. कारण युरिनला स्वच्छ ठेवते. आणि स्टोन बनवणाऱ्या खनिजांना बाहेर काढते. जास्त मीठ, तळलेले आणि भाजलेले आणि पॅकेज्ड पदार्थांना टाळावे. प्रोटीनच्या सेवन संतुलित प्रमाणात करावे आणि हिरव्या भाज्या, फळ तसेच फायबर युक्त आहार जास्त खावा. शुगर आणि सोडा ड्रिक्स किडनीवर दबाव वाढवतात. यामुळे त्यांचे प्रमाण कमी करण्यात फायदा आहे. नियमित व्यायामाने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे मदत करते.