AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?

रात्रीचं जागरण झाले तर दिवस आळसावल्यासारखा जाणे हे सामान्य आहे. परंतू रात्रभर नीट झोपून झाले तरी दिवसभर आळसात जाणे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?
| Updated on: Jun 27, 2025 | 9:18 PM
Share

रात्रीचे चांगलं झोपूनही दिवस आळसात जात असल्याची अनेकांची तक्रार असते. मग कामाच्या ठिकाणी डुलक्या काढाव्या लागतात. शरीराला थकवा जाणवतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सारखी डोळ्यावर झापड येतेय तर याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं एका गंभीर समस्येचा संकेत असू शकतात. अखेर का असे होते. आणि यापासून सुटका कशी करायची ते जाणून घेऊयात..

हायपर सोम्नियाचा तर त्रास नाही ना

रात्रीच्या जागरणानंतर दिवसा झोप येणे ही सामान्य बाब आहे. परंतू रात्री नीट झोपल्यानंतर जर दिवसा सारखा आळस येत असले तर ही बाब काही सामान्य म्हटली जात नाही. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. हा प्रकार हायपरसोम्नियाने ( Hypersomnia ) देखील होऊ शकतो. या स्थितीत व्यक्तीला प्रमाणाच्या बाहेर झोप येते. या हायपर सोम्नियाचे कारण काही वाईट सवयी आणि रोग असू शकतात.

ही असू शकतात कारणे

मद्य :

जास्त मद्यपान केल्याने झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसभर झोप येऊ शकतात.

मसल्स कमजोर :

जर बॉडीमध्ये मसल्स कमजोर असतील तर वारंवार झोप येऊ शकते.

रात्रीची नीट झोप न येणे:

अनेकांना रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे रात्री बिछान्यात तळमळत पडावे लागते. याने हायपरसोम्नियाचा धोका आणखी वाढतो.

औषधाचे साईड इफेक्ट :

अनेकदा औषधांच्या साईड इफेक्टमुळे हायपरसोम्नियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसा झोप अधिक येते.

मधुमेह :

डायबिटीज झाल्यानंतर शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर हायपरसोम्नियाचा त्रास वाढू शकतो.डायबिटीजमध्ये शरीर ग्लुकोजला ऊर्जेत बदलण्यात असमर्थ असते. यामुळेही दिवसाचा थकवा आणि झोप येते.वारंवार तहान लागणे आणि लघवीला येणे, वजन कमी होणे याची लक्षणे आहेत.

थायरॉईड:

हायपोथायरायडिज्ममध्ये थायरॉईड ग्रंथी प्रभावित होतात. त्याचा प्रभाव मेटोबॉलिज्मवर पडतो. यामुळे सुस्ती , थकवा आणि वारंवार झोप येण्याची समस्या वाढते. वजन वाढणे, थंडी वाजणे आणि केस गळणे याचे लक्षण आहे.

एनीमिया:

एनिमियात हिमोग्लोबिन कमी असल्याने शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे थकवा आणि झोपेची समस्या वाढू शकते. हे आर्यन, विटामिन्स बी-12 वा फोलिक एसिडच्या कमतरतेने होऊ शकते.

स्लीप एपनिया:

स्लीप एपनिया एक अशी स्थिती आहे यात गाढ झोपेत असताना श्वास वारंवार थांबतो. त्यामुळे गाढ आणि सुखाची झोप येत नाही.या कारणाने दिवसाची झोप येते. थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमी सारखी लक्षणे दिसतात.

काय आहेत लक्षणे ?

एंग्जायटी आणि स्ट्रेस

चिडचिडेपणा

दिवसभर चिडचिडपणा

शरीर थकलले वाटणे

सर्व गोष्टींवर राग येणे

सकाळी झोपेतून उठूच नये असे वाटणे

डोकेदुखी

भूख न लागणे

वारंवार एखादी गोष्ट विसरणे

बेचैन झाल्यासारखे वाटणे

एकाग्रता करताना अडचण येणे

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.