Constipation Problem : बद्धकोष्ठतेचा त्रास टाळायचा असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका..

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ राहिल्यास कोलन कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळेच ही समस्या टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

Constipation Problem : बद्धकोष्ठतेचा त्रास टाळायचा असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका..
| Updated on: Aug 25, 2023 | 6:03 PM

Constipation Problem : प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा (constpation) त्रास जाणवतो. पण ही समस्या सतत होत राहिल्यास त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांचा कर्करोग देखील होऊ शकतो, असे असले तरीही बहुतेक लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हा रोग खूप गंभीर बनतो. अशा परिस्थितीत ते टाळणे आवश्यक आहे.

आहारात बदल करून ही समस्या टाळता येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी योग्य जीवनशैलीही तितकीच गरजेची आहे. कारण या आजाराची काळजी न घेतल्यास पोटाच्या कर्करोगापासून अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी आहारात फळे, हिरव्या भाज्या, गव्हात चिया इत्यादी मिसळून खा. याशिवाय, संपूर्ण धान्याचे ब्रेड, बीन्स आणि ओट्स यामध्ये देखील फायबरचे प्रमाण चांगले असते. बद्धकोष्ठता असेल तरी ती कमी करण्यासाठी हे पदार्थ खूप मदत करतात.

रात्री हे पदार्थ खाऊ नका

बद्धकोष्ठता असेल तर प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पांढरा भात किंवा पास्तासारखे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे जंक फूड, केळी, लाल मांस आणि बेकरी उत्पादनांचे सेवन करू नका. या गोष्टींमुळे बद्धकोष्ठता वाढते. या सर्व गोष्टी पचायला जड जातात ज्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते.

पोटदुखी हलक्यात घेऊ नका

डॉक्टर सांगतात की ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच काळापासून असते, त्यांना देखील पोटदुखीचा त्रास सुरू होतो. काही लोक हे पोटदुखीकडे दुर्लक्ष करतात, परंतु तसे करू नये. बद्धकोष्ठतेची समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांना दाखवावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)