पालकांनो इकडे लक्ष द्या… मुलांच्या डब्यात हे 3 पदार्थ कधीच देऊ नका

ब्रेड जॅमसह असे अनेक पर्याय आहेत, जे आपण मुलांना शाळेत टिफीनमध्ये देतो. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे मुलांच्या आरोग्यदायी जेवणाच्या डब्यासाठी पर्याय असू शकत नाहीत.

पालकांनो इकडे लक्ष द्या... मुलांच्या डब्यात हे 3 पदार्थ कधीच देऊ नका
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 17, 2023 | 3:00 PM

Kids Lunch Box : लहान मुलांचे खाण्याचे नखरे खूप असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. पौष्टिक पदार्थ (healthy food) त्यांच्या पोटात जाण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. मुले अनेकदा खाण्यास लाजतात. त्यांच्या आवडीनिवडीही वेगळ्या असतात. जेव्हा मुलांसाठी निरोगी आणि पौष्टिक जेवणाचा डबा पॅक करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा आपण त्यांना टिफिन देताना विशेष काळजी घेतली पाहिजे. ब्रेड जॅमसह असे अनेक पर्याय आहेत, जे आपण मुलांना डब्यात देत असतो. पण हे पदार्थ काही पौष्टिक (unhealthy) नसतात. असे अनेक पदार्थ आहेत, जे मुलांसाठी हेल्दी लंचबॉक्स म्हणून योग्य ठरत नाहीत.

हे पदार्थ टाळून तुम्ही तुमच्या मुलाच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकता. या लेखात अशा पदार्थांबद्दल जाणून घेणार, जे तुम्ही मुलांना जेवणाच्या डब्यात देणे टाळले पाहिजे.

मॅगी वा नूडल्स

तुम्ही शाळेसाठी मुलाचा टिफिन पॅक करत असाल तर जेवणाच्या डब्यात नूडल्स किंवा मॅगी ठेवू नका. मैद्यापासून बनवलेल्या या दोन्ही गोष्टी मुलांच्या आरोग्यासाठी बिलकूल फायदेशीर नाहीत. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये ४ तासांचा कालावधी असतो, या दरम्यान मुलांना खूप भूक लागते. मॅगी निःसंशयपणे तुमच्या मुलाची भूक काही काळ शांत करू शकते पण त्यामुळे मुलाला पुन्हा पुन्हा भूक लागते आणि ते हेल्दी नसते. अशा वेळेस तुम्ही त्यांना मधल्या खाण्यासाठी ड्रायफ्रुटस, किंवा कापलेली फळ देऊ शकता.

शिळं अन्न

अनेक वेळा पालक मुलांच्या टिफिनमध्ये उरलेली करी किंवा भाजी टिफिन बॉक्समध्ये पॅक करतात. पण दुपारची वेळ आली की त्या पदार्थांची टेस्ट तर बिघडतेच, पण पोषणमूल्येही कमी होतात. याशिवाय अन्नपदार्थ खराब होण्याची भीतीही असते. त्यामुळे मुलांना अन्नातून विषबाधाही होऊ शकते. लहान मुलं काय किंवा मोठी माणसं, कोणीही असो, शिळे पदार्थ खाणं टाळावचं.

तळलेले पदार्थ

जास्त तळलेले अन्नपदार्थ देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, भजी आणि तळलेले चिकन नगेट्स यांसारख्या पदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर चरबी आढळते. त्यामुळे मुलांचे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. त्याऐवजी, बेकिंग, ग्रिलिंग किंवा वाफवून केलेले पदार्थ खाण्याची सवय लावावी. तसेच मुलांना प्रक्रिया केलेले अन्न देणे टाळावे.