ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह, कॉफी मशीन किंवा फ्रीजचा वापर करता का ? व्हा सावध, अन्यथा हे खतरनाक आजार वाढवतील तुमची चिंता

| Updated on: Mar 04, 2023 | 8:09 AM

अनेक अभ्यासाचे निष्कर्ष असे दर्शवतात की बरेच लोक शौचालयात जाऊन आल्यावर आपले हात पूर्णपणे स्वच्छ धुवत नाहीत. त्यामुळे त्यातून संसर्ग पसरवणारे बॅक्टेरिया स्वयंपाकघरातील वस्तूंवर पसरतात.

ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह, कॉफी मशीन किंवा फ्रीजचा वापर करता का ? व्हा सावध, अन्यथा हे खतरनाक आजार वाढवतील तुमची चिंता
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये असलेल्या किचन एरियाचा वापर तिथे काम करणारे लोकही करतात. काहीजण दुपारचे जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा (microwave) वापर करतात तर काही चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी तिथे ठेवलेले मशीन वापरतात. आपण विविध कारणांमुळे कार्यालयीन किचनमधील वस्तूंच्या (things in office kitchen) संपर्कात येतो. एका रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की ऑफिस किचनमध्ये असलेली किटली, फ्रिजच्या दाराचे हँडल, कॉफी मशीन, चहाचे मशीन, मायक्रोवेव्हची बटणे अशा वस्तूंवर धोकादायक बॅक्टेरिया (harmful bacteria) आढळतात. जेव्हा आपण या गोष्टी वापरतो तेव्हा आपणही या धोकादायक जीवाणूंच्या संपर्कात येतो, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

ब्रिटीश शास्त्रज्ञांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. किचनमध्ये ठेवलेल्या या वस्तूंवर मलाच्या (विष्ठे) माध्यमातून येतात, असे त्यांनी सांगितले. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसटीएम) मधील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे संशोधक डॉ ॲडम रॉबर्ट्स म्हणाले की, अभ्यासाचे परिणाम असे दर्शवतात की अनेक लोक टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर आपले हात व्यवस्थित धूत नाहीत. त्यामुळे त्यातून संसर्ग पसरवणारे जिवाणू अथवा बॅक्टेरिया हे स्वयंपाकघरातील वस्तूंवर पसरतात. यामुळे, संसर्गास जास्त संवेदनशील असलेली लोकं आजारी पडण्याचा आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

हे सुद्धा वाचा

आढळला धोकादायक बॅक्टेरिया

या अभ्यासासाठी, कार्यालयाच्या जागेत आणि बांधकाम कामगारांच्या परिसरात असलेल्या स्वयंपाकघरातून घेतलेल्या स्वॅबमध्ये Escherichia coli (ई.कोली) सह विविध प्रकारच्या जीवाणूंची उपस्थिती आढळून आली. Escherichia coli हा एक बॅक्टेरिया आहे, ज्यामुळे अतिसार आणि मूत्रमार्गात संसर्ग (UTI) सारखे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार होऊ शकतात. तसेच काही वस्तूंवर स्यूडोमोनास बॅक्टेरिया देखील आढळून आले, ज्यामुळे न्यूमोनिया सारखे श्वसन संक्रमण होऊ शकते. त्याशिवाय स्वयंपाकघरातील जवळपास सर्व 11 वस्तूंवर क्लेब्सिएला नावाचा जीवाणू देखील आढळून आला. हे जीवाणू विष्ठेद्वारे पसरतात, ज्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो.

वैयक्तिक स्वच्छतेची घ्या काळजी

स्वयंपाकघरात ठेवलेल्या बहुतांश वस्तूंवरही बुरशी आढळून आल्याचे संशोधकांनी सांगितले. बुरशीचा सर्वाधिक परिणाम फ्रिजच्या दरवाजाच्या हँडलला झाला. हा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे डॉक्टरांनी नमूद केले. अभ्यासानुसार, फ्रीजच्या दरवाजाचे हँडल, कॉफी मशीन आणि किटली अशा काही गोष्टी आहेत ज्यावर सर्वाधिक जीवाणू आढळले आहेत. कारण ते कार्यालयातील बहुतेक लोक वापरतात.