ब्रश, कंगवा,उशीमध्ये बॅक्टेरिया, आजारी पडण्यापूर्वी वेळेत ‘या’ गोष्टी बदला

ब्रश, कंगवा,उशीमध्ये बॅक्टेरिया, आजारी पडण्यापूर्वी वेळेत 'या' गोष्टी बदला

आपण दररोज वापरणाऱ्या 7 गोष्टी खराब होण्याची वाट पाहण्यापेक्षा काही कालावधीनंतर बदलणे गरजेचे (Replace Daily Use Items) असते.

Namrata Patil

|

Dec 07, 2020 | 1:34 PM

मुंबई : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ब्रश, कंगवा, उशी यासारख्या अनेक गोष्टींचा (Replace Daily Use Items) वापर करतो. या गोष्टींचा आपण वर्षांनुवर्षे वापर करतो. दैनंदिन वापरातील एखादी गोष्ट खराब होत नाही, तोपर्यंत आपण ती बदलत नाही. पण या गोष्टी जर वेळीच बदलल्या नाही, तर तुम्ही आजारी पडू शकता. खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून दररोज वापरणाऱ्या गोष्टींचाही आपल्या शरीरावर थेट परिणाम होतात. आपण दररोज वापरणाऱ्या 7 गोष्टी खराब होण्याची वाट पाहण्यापेक्षा काही कालावधीनंतर बदलणे गरजेचे असते.

टूथब्रशवर 1 कोटींपेक्षा जास्त बॅक्टीरिया

आपण दररोज सकाळी उठल्यानंतर टूथब्रशने दात (Replace Daily Use Items) घासतो. पण त्या टूथब्रशवर 1 कोटीपेक्षा जास्त बॅक्टीरिया असतात. त्यामुळे नेहमी ब्रश साफ ठेवणे गरजेचे असते. तुम्हीही ब्रश बदलण्यासाठी त्याचे ब्रिसल्स खराब होण्याची वाट पाहात असाल, तर तुमची ही सवय बदला. कारण अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या माहितीनुसार दर 3 ते 4 महिन्यात टूथब्रश बदलणे गरजेचे आहे. तसेच दात घासल्यानंतर टूथब्रशही स्वच्छ केला पाहिजे.

6 महिन्यांनी कंगवा बदला

टूथब्रशप्रमाणे हेअरब्रशही अनेकजण वर्षानुवर्षे बदलत नाहीत. प्रत्येकाचा आवडता कंगावा असतो आणि अगदी वर्षानुवर्षे अनेकजण त्याचा वापर करतात. तज्ज्ञांच्या मते हेअर ब्रश आणि कंगवा साफ करण्यासोबतच तो दर 6 महिन्यांनी बदलला पाहिजे. त्यामुळे केस गळणे किंवा तुटण्याची समस्या कमी होते.

भांडी घासण्याचा स्पंजमध्येही बॅक्टेरिया

प्रत्येकाच्या घरात भांडी घासण्याचा स्पंज हा खराब होईपर्यंत वापरला जातो. मात्र तसे न करता भांडी घासण्याचा स्पंज हा किमान 2 ते 4 आठवड्यांनी बदलला पाहिजे. जर तुम्ही हा स्पंज बदलला नाही, तर त्याला लागलेले बॅक्टेरिया पुन्हा भांड्याद्वारे तुमच्या शरीरात जातात.

चॉपिंग बोर्डही बदलणे गरजेचे

भांडी घासण्याच्या स्पंजप्रमाणे स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणार चॉपिंग बोर्डही नियमित बदलणे गरजेचे आहे. जरी तुम्ही चॉपिंग बोर्डचा वापर केल्यानंतर तो धुवून घेतला तरी त्या बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शक्यता असते. त्यामुळे तुम्ही किमान दर 3 महिन्याने चॉपिंग बोर्ड बदलला पाहिजे. तसेच लाकडी चॉपिंग बोर्डपेक्षा इतर प्रकारच्या चॉपिंग बोर्डचा वापर करणे फायदेशीर ठरते.

उशीही बदला 

अनेकांना वर्षांनुवर्षे चादर आणि उशीची सवय झालेली असते. काहींना तर त्या चादरी किंवा उशीशिवाय झोपच लागत नाही. कोणतीही उशी तुम्ही ठराविक काळासाठी वापरु शकता. कारण रात्री उशीवर झोपल्यावर उशी तुमच्या केसावरील तेल खेचून घेतले. जरी तुम्ही उशीला कव्हर लावलं असेल आणि नियमित ते स्वच्छ धुवत असाल तरीही किमान 1 ते 2 वर्षांनी तुम्ही उशी बदलणे गरजेचे आहे.

दर 3 महिन्यांनी मेकअप ब्रश बदला

अनेक मुलींना मेकअप करण्याची फार हौस असते. पण कधीकधी ब्रँडेड किंवा महागडे मेकअपचा वापर करुनही चेहऱ्यावर फोड्या येतात. याचे मुख्य कारण तुमचे प्रॉडक्ट आणि मेकअप ब्रश आहे. जर तुमचा मेकअप ब्रश किंवा ब्यूटी ब्लेंडर खराब आहे आणि तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तो साफ केलेला नाही. तर त्यात बॅक्टेरिया निर्माण होतो. ज्यामुळे तुम्ही तो मेकअप लावल्यानंतर तुम्हाला खाज किंवा जळजळणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे दर 3 महिन्यांनी मेकअप ब्रश बदलणे गरजेचे (Replace Daily Use Items) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें