आजच सावध व्हा! हे पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती करतात कमकुवत!

| Updated on: Jul 19, 2023 | 8:54 AM

आपण कधीकधी अशा काही गोष्टींचे सेवन करतो जे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करण्याचे काम करतात. अशावेळी जर तुम्हीही जाणूनबुजून किंवा नकळत अशा काही गोष्टींचे सेवन करत असाल ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते तर आजच सावध व्हा.

आजच सावध व्हा! हे पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती करतात कमकुवत!
food for bad immunity
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: आजकाल पावसाळा सुरू आहे, अशा परिस्थितीत लोकांना अनेक आजार होत आहेत. या ऋतूत अनेक प्रकारचे मोठे आजार आपल्याला होतात. अशा वेळी आपण आपली प्रतिकारशक्ती बळकट केली पाहिजे. परंतु आपण कधीकधी अशा काही गोष्टींचे सेवन करतो जे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करण्याचे काम करतात. अशावेळी जर तुम्हीही जाणूनबुजून किंवा नकळत अशा काही गोष्टींचे सेवन करत असाल ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते तर आजच सावध व्हा. चला तर मग बघुया आपण कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये?

‘हे’ पदार्थ कमकुवत करतात रोगप्रतिकारशक्ती-

साखर

तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असावी असे वाटत असेल तर गोड गोष्टींपासून दूर राहा. जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही साखरेपासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन टाळले पाहिजे. यामध्ये आइस्क्रीम, केक, कँडी, चॉकलेट आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळावे.

पॅकेज्ड गोष्टी

अनेकांना पॅकेज्ड गोष्टी खाण्याची आवड असते, पण तुम्हाला माहित आहे का की या गोष्टी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवण्याचे काम करतात, जर तुम्ही जास्त खारट पदार्थांचे सेवन केले तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

फॅटी ॲसिड्स

शरीराला ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड या दोन्ही गोष्टींची गरज असते. परंतु जर तुम्ही ओमेगा 3 चे सेवन जास्त केले तर हे फॅटी ॲसिड प्रतिकारशक्ती कमी करते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ नये असे वाटत असेल तर ओमेगा-६ असलेल्या गोष्टी टाळाव्यात. कारण गोष्टी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करण्याचे काम करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)