नकारात्मक विचारांनी वेढल्यामुळे झालात अस्वस्थ ? ‘या’ उपायांनी मिळेल मदत

| Updated on: Dec 24, 2022 | 4:43 PM

प्रत्येक व्यक्तीला नकारात्मक विचारांपासून दूर रहायची इच्छा असते, मात्र तरीही मनात नकारात्मक विचार हे येतातच. ते दूर ठेवण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत.

नकारात्मक विचारांनी वेढल्यामुळे झालात अस्वस्थ ? या उपायांनी मिळेल मदत
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार (negative thoughts) हे त्याच्या जीवनातील समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात, त्याचा त्या व्यक्तीचे व्यावहारिक आयुष्य आणि वैयक्तिक जीवन (effect on life) या दोन्हीवर परिणाम होतो. हे विचार अनेकदा व्यक्तीमध्ये तणाव, आत्मविश्वासाचा अभाव आणि चिंता (stress, low confidance and anxiety) यांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे नकारात्मक विचार दूर ठेवणे महत्वाचे ठरते. ते कसे करावे हे जाणून घेऊया.

आपल्या विचारांबद्दल जागरूक रहावे

कोणत्याही व्यक्तीला नकारात्मक विचारांपासून दूर रहायची इच्छा असते. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की प्रयत्न करूनही मनात नकारात्मक विचार हे येतातच. अशावेळी आपण आपल्या विचारांबद्दल जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनात एखादा नकारात्मक विचार आलाच तर तो काढून लगेच त्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा.

हे सुद्धा वाचा

स्वत:ला व्यस्त ठेवा

रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, असं म्हटल जातं. त्यामुळे आपण स्वत:ला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणे महत्वाचे ठरते. एखादी नवी गोष्ट शिकावी, किंवा स्वत:चा छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, पुस्तक वाचावे किंवा खेळ खेळावा. जेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या कामात गुंतवून घ्याल तेव्हा नकारात्मक विचार मनात येणारही नाहीत.

वादविवाद, भाडणांपासून दूर रहावे

आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचार करणारे, किंवा इतरांबद्दल वाईट बोलणारे, चहाड्या करणारे जे लोक असतील त्यांच्यापासून दूर रहावे. जे भांडण-तंटा करतात, त्यांच्यापासूनही लांब रहावे. तुम्ही अशा लोकांच्या सान्निध्यात राहिलात तर तुम्हीही नकारात्मक विचार करू लागता. त्यामुळे अशा लोकांना लांबच ठेवावे.

 झोप पूर्ण करा

झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. अशा वेळी अधिक नकारात्मक विचार मनात येतात. त्यामुळे पुरेशी व शांत झोप घेणे महत्वाचे ठरते. झोप पूर्ण झाली तर चिडचिड आणि अस्वस्थता दूर होते आणि मनातही नकारात्मक विचार येत नाहीत.

संगीत ऐकावे

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दररोज 25 मिनिटे आपल्या आवडीची गाणी किंवा संगीत ऐकल्याने पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे रोज थोडा वेळ तरी आवडीचे संगीत ऐकावे. अशाने तुमचं मन नकारात्मक विचारांपासून दूर राहील.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)