AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनमधील हे सेन्सर्स तुमची रोजची कामे करतील सोपी, ॲप वापरण्याचीही पडणार नाही गरज

तुमचा फोन अनेक सेन्सर्सने सुसज्ज आहे. त्यांचे काम फोनच्या हालचालींना प्रतिसाद देणे आहे. शिवाय हे सेन्सर्स तुमच्या दैनंदिन कामांसाठी देखील वापरले जाऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात हे कोणते सेन्सर्स आहे ते जाणून घेऊयात.

फोनमधील हे सेन्सर्स तुमची रोजची कामे करतील सोपी, ॲप वापरण्याचीही पडणार नाही गरज
Mobile Phones
| Edited By: | Updated on: Feb 06, 2026 | 9:52 PM
Share

आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कारण हा स्मार्टफोन आता आपली रोजची कामे सोपी करतो, तसेच तासंतास लाईनमध्ये उभे राहण्यापेक्षा बँके पासून ते बिल भरण्यापर्यंतचं काम आपण घरात बसून मोबाईलमध्येच करत असतो. मात्र हे स्मार्टफोन फक्त कॉल करण्यासाठी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ स्क्रोल करण्याइतकं राहिलेलं नाहीये. तर त्यामध्ये असंख्य सेन्सर्स आहेत जे तुमचा फोन स्मार्ट बनवतात. तसेच या फोनच्या नॉर्मल यूजच्या व्यतिरिक्त त्यांचे इतरही अनेक उपयोग आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमची दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण करू शकता. आजच्या लेखात आपण स्मार्टफोनमधील अशा काही सेन्सर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमची अनेक कामे सोपी करू शकते.

फोनमध्ये असलेले सेन्सर मोशन आणि दिशादर्शन ट्रॅक करतात. यासाठी अ‍ॅक्सेलेरोमीटर आणि जायरोमीटर वापरले जाते आणि दोन्ही सेन्सर जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असतात. तर हे सेन्सर तुमचा फोन किती वेगाने आणि कोणत्या दिशेने फिरत आहे हे त्याचे दिशादर्शन दर्शवतात. हे सेन्सर्स लेव्हलिंग टूल म्हणून वापरले जाऊ शकतात. जर तुम्हाला फ्रेम, आरसा किंवा पोस्टर एखाद्या रूममध्ये लावयचे असेल तर तुम्ही त्याची योग्य लेव्हल मोजण्यासाठी या सेन्सर्सचा वापर करू शकता. तर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जे लेव्हल निश्चित करण्यासाठी या सेन्सर्सचा वापर करतात.

या सेन्सरमुळे योग्य ब्राईटनेसचा वापर करता येतो

तुमच्या फोनमध्ये अँबियंट लाईट सेन्सर आहे. यामुळे तुमच्या फोनला सभोवताल असलेला प्रकाश किंवा लाईट ओळखण्यास मदत होते. जर अंधार असेल तर सेन्सर फोनची ब्राइटनेस थोडी कमी करेल आणि जर तुम्ही उन्हात उभे असाल तर ते ब्राइटनेस वाढवेल, ज्यामुळे तुम्हाला डिस्प्ले अधिक स्पष्टपणे पाहता येतो. हा सेन्सर तुमच्या कॅमेरा किंवा डेस्क लॅम्पची ब्राइटनेस देखील मोजू शकतो, ज्यामुळे परफेक्ट लाईटिंग सुनिश्चित होते आणि डोळ्यांचा ताण कमी होतो. त्याचप्रमाणे हा सेन्सर फोनचा मायक्रोफोन ऑडिओ लेव्हल देखील मोजू शकतो.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार