AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grapes | या 5 रोगांपासून तुम्हाला दूर ठेवतील द्राक्षे! आरोग्यासाठी अनेक फायदे…

लहानपणापासून आपल्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक फळाचं आपलं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. असं एकही फळ नाही ज्याचा आपल्या आरोग्यास फायदा नाही. तरीही आपण फळे खाण्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण पाहणार आहोत द्राक्षे खाण्याचे फायदे. आरोग्याला द्राक्षे खाण्याचे अनेक अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात...

Grapes | या 5 रोगांपासून तुम्हाला दूर ठेवतील द्राक्षे! आरोग्यासाठी अनेक फायदे...
Grapes benefitsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 21, 2023 | 7:24 PM
Share

मुंबई: द्राक्षे हे अनेकांचे आवडते फळ आहे. याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. द्राक्षे हे पोषक तत्वांचे भांडार आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी तसेच पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. फ्लेव्होनॉइड्स द्राक्षांमध्ये आढळणारे सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट घटक आहेत, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. एवढेच नव्हे तर द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ॲसिड सारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

द्राक्षे खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

1. डोळ्यांसाठी फायदेशीर

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्यांना डोळ्यांची समस्या आहे ते आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश करू शकतात.

2. मधुमेहात आराम

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी द्राक्षांचे सेवन करावे. हे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते. याशिवाय द्राक्षांमध्ये लोह सुद्धा असते.

3. ॲलर्जीचा दूर होते

काही लोकांना त्वचेच्या ॲलर्जीचा सामना करावा लागतो. द्राक्षांमध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात, जे त्वचेशी संबंधित ॲलर्जी दूर करण्यास उपयुक्त असतात.

4. कर्करोग प्रतिबंध

द्राक्षांमध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ॲसिड सारखे अनेक घटक असतात. टीबी, कॅन्सर आणि रक्तसंक्रमण यांसारख्या आजारांमध्ये द्राक्षे प्रामुख्याने फायदेशीर ठरतात. कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी द्राक्षे उपयुक्त ठरतात.

5. ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव

ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी द्राक्षांचे सेवन फायदेशीर ठरते. एका संशोधनानुसार स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी द्राक्षांचे सेवन फायदेशीर ठरते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?