
मुंबई: उन्हाळ्याच्या ऋतूत थंड पदार्थांचे सेवन करणे लोकांना आवडते. अशावेळी लोक काकडी, आईस्क्रीम, थंड पाण्याचे सेवन करतात. या सर्वांमध्ये पुदीन्याचाही समावेश होतो. खरं तर पुदिन्याची पाने शरीराला थंड करण्याचं काम करतात. ते जेवणात घातल्याने चव वाढते. पुदिन्याची पाने अनेक भाज्यांमध्ये देखील घातली जातात. इतकंच नाही तर पुदिन्याची पाने या ऋतूत अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतात. पुदिन्यात व्हिटॅमिन-सी, प्रोटीन, मेन्थॉल, व्हिटॅमिन-ए, कॉपर, कार्बोहायड्रेट सारखे पोषक घटक असतात. खरं तर उन्हाळ्यात मळमळ, गॅस आदी समस्यांनी लोक अनेकदा त्रस्त असतात. अशावेळी पुदिन्याची पाने तुम्हाला आराम देऊ शकतात. जाणून घेऊया पुदिन्याच्या पानांचे असंख्य फायदे…
उन्हाळ्यात अनेकदा लोकांना पोटाशी संबंधित समस्या जाणवू लागतात. अशावेळी तुम्ही पुदिन्याची पाने वापरू शकता. पेपरमिंट पाचन समस्यांवर एक नैसर्गिक उपचार असू शकतो. यात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे अपचन दूर करण्यास उपयुक्त असतात. तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता यामुळे पोटाची अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.
पुदिन्याच्या पानांमध्ये डोकेदुखी कमी करणारे गुणधर्म असतात. अनेकदा उन्हाळ्यात लोक डोकेदुखीला बळी पडतात. कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे डोक्यात भयंकर वेदना जाणवतात. अशा तऱ्हेने ताजेपणाने भरलेली ही पुदिन्याची पाने तुम्ही वापरू शकता. याची सुगंधित पाने आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही पुदिना तेल किंवा पुदिन्याच्या बामने डोक्याला मसाज करू शकता.
जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाला असाल तर पुदिन्याची पाने तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात. पुदिन्याची पाने वजन कमी करण्यास उपयुक्त असतात. यासाठी तुम्ही पुदिन्याची पानं पिऊ शकता. हवं तर लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडर घालू शकता. यामुळे तुमचे पेय अधिक चविष्ट होईल. हे पेय दररोज रिकाम्या पोटी प्यावे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)