मधुमेह असेल तर रोज करा ‘ही’ योगासनं; ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास होईल मदत

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. औषधासोबत काही योगासने केली तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. जागतिक मधुमेह दिनानिमित्त जाणून घ्या कोणती योगासनं रुटीनमध्ये करावी.

मधुमेह असेल तर रोज करा ‘ही’ योगासनं; ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास होईल मदत
मधुमेह असेल तर रोज करा ‘ही’ योगासनं
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 15, 2026 | 12:18 PM

आजकाल सर्व वयोगटांतील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मधुमेह हा दीर्घकालीन चयापचयाशी संबंधित आजार असून, शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा त्याचा योग्य वापर न झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. चुकीच्या आहाराच्या सवयी, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यांसारख्या घटकांमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. औषधोपचारांसोबत काही योगासनांचा सराव केल्यास रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती योगासने करता येतील.

कटीचक्रासन

हे आसन करण्यासाठी पाय खांद्याच्या रुंदी इतके अंतर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत पसरवा. आता कंबर आणि शरीराचा वरचा भाग उजव्या बाजूला वळवा. काही सेकंद या स्थितीत थांबून सुरुवातीच्या स्थितीत या. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही हीच कृती करा.

Loading...

पवनमुक्तासन

पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही गुडघे वाकवून छातीजवळ आणा. हातांची बोटे एकमेकांत गुंफून गुडघ्यांना धरून ठेवा. त्यानंतर डोके वर उचलून हनुवटी गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. काही वेळ या स्थितीत थांबा आणि हळूहळू सुरुवातीच्या स्थितीत या.

सर्वांगासन

पाठीवर झोपून दोन्ही पाय एकत्र सरळ ठेवा. हातांचा आधार घेत हळूहळू पाय वर उचला आणि नितंब जमिनीपासून वर आणा. पाठीला हातांचा आधार देत शरीर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत काही वेळ थांबा आणि सावकाश सुरुवातीच्या स्थितीत परत या. हे आसन करताना मानेवर ताण येणार नाही याची काळजी घ्या.

हलासन

पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. पोटाच्या स्नायूंच्या मदतीने पाय हळूहळू वर उचला आणि डोक्याच्या दिशेने मागे न्या. शक्य असल्यास पायाची बोटे डोक्याच्या मागील बाजूला जमिनीला टेकवा. काही वेळ या स्थितीत थांबून सावकाश सुरुवातीच्या स्थितीत परत या. पाय जमिनीला टेकवण्यासाठी जोर करू नका.

मत्स्यासन

पद्मासनात बसून हातांचा आणि कोपरांचा आधार घेत हळूहळू मागे वाका. छाती वर उचला आणि डोक्याचा वरचा भाग जमिनीला टेकवा. या स्थितीत शरीर शिथिल ठेवून संथ आणि खोल श्वास घ्या. काही वेळानंतर सावकाश सुरुवातीच्या स्थितीत परत या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us