अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार

चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला 'बोन ग्लू' तयार केला आहे. हा ग्लू केवळ 2-3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडतो. तसेच हा ग्लू 6 महिन्यांत शरीरात विरघळते. याचे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार... जगातील पहिला बोन ग्लू तयार
Bone Glue
| Updated on: Sep 13, 2025 | 4:03 PM

चिनी शास्त्रज्ञांनी एक वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा शोध लावला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला ‘बोन ग्लू’ तयार केला आहे. हा ग्लू केवळ 2-3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडतो. तसेच हा ग्लू 6 महिन्यांत शरीरात विरघळते. याचे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे आता शरीरातील हाड जोडण्यासाठी महागडे रॉड वापरण्याची गरज नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बोन ग्लू म्हणजे काय?

चिनी शास्त्रज्ञांनी ‘बोन 02’ नावाचे एक बायोमटेरियल विकसित केले आहे, हे हाडे चिकटवण्यासाठी वापरले जाते. हा बोन ग्लू ऑयस्टरपासून प्रेरणा घेऊन बनवलेला आहे. हा ग्लू हाड मोडलेल्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे लावल्यास तुटलेली हाडे 2-3 मिनिटांत जोडली जातात. या आधी मोडलेले हाड जोडण्यासाठी धातूचे रॉड वापरले जायचे. काही काळानंतर हाड जोडल्यानंतर रॉड काढण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागायची. मात्र आता हा ग्लू हाड बरे झाल्यावर 6 महिन्यांनी स्वतःहून विरघळतो, त्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही.

बोल ग्लू कसा काम करतो?

बोन ग्लू हा एक चिकट पदार्थ आहे. हा ग्लू रक्त असलेल्या भागातही घट्ट चिकटतो. शास्त्रज्ञांनी 50 हून जास्त वेळा याची चाचणी केली असून शेकडो प्रयोगदेखील केले आहे. हा ग्लू शरीरासाठी सुरक्षित आहे. तो हाडांना बरे होण्यास मदत करतो आणि नंतर विरघळतो.

चीनमधील वेन्झोऊ येथील डॉ. लिन आणि त्यांच्या टीमने हा ग्लू विकसित केला आहे. आतापर्यंत 150 हून अधिक रुग्णांवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे असून याचे निकाल चांगले आहेत. या ग्लू मुळे तुटलेली हाडे, फ्रॅक्चर आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांमध्ये क्रांती होणार आहे. यामुळे शस्त्रक्रियेचा वेळ आणि खर्च कमी होणार आहे.

दरवर्षी जगभरातील लाखो लोकांची हाडे तुटतात. यावरील उपचार महागडे आणि वेदनादायक आहेत. धातूचे रॉड लावल्यास लावल्याने संसर्गाचा धोका किंवा दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा खर्च वाढतो. मात्र बोन ग्लू या समस्येवर उपाय आहे. हा ग्लू पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजेच ते शरीरात विरघळते. चीनने त्यासाठी चिनी आणि आंतरराष्ट्रीय पेटंट (PCT) साठी अर्ज केला आहे. त्यामुळे आगामी काळात याचा वैद्यकीय क्षेत्रात फायदा होणार आहे.