सिगारेट पिणाऱ्यांनो सावधान, स्री आणि पुरुष दोघांच्या फर्टीलिटीला असा होतो धोका…

Cigarette Smoking Side Effects: सिगारेट पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक घातक आजारांचा धोका वाढू शकतो. सिगारेटचा धूर फुफ्फुसांना नुकसान पोहोचव असतो आणि हृदयरोगाचा धोका देखील त्यामुळे वाढत असतो

सिगारेट पिणाऱ्यांनो सावधान, स्री आणि पुरुष दोघांच्या फर्टीलिटीला असा होतो धोका...
Cigarette smokers beware, it threatens fertility in both men and women
| Updated on: Apr 12, 2025 | 4:42 PM

Cigarette : तरुणाईला सिगारेट्सचे व्यसन लागलेले आहे. सिगारेट्स पिणाऱ्यांना लवकर म्हातारपण येते. सिगारेट्सच्या पाकिटावर कॅन्सर झालेल्या व्यक्तीचे छायाचित्र लावलेले असते तरीही त्याचा कोणताही फायदा या व्यसनी लोकांवर होत नाही. सिगारेट्समध्ये तम्बाकू असतो. त्याचा धुर शरीराच्या अंतर्गत अवयवांना डॅमेज करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात लाखो लोकांचा मृत्यू सिगारेट्सच्या ध्रुमपानामुळे होत असतो. अमेरिकेत धुम्रपानामुळे सुमारे पाच लाख तरुणांचा मृत्यू होत असतो.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिव्हेन्शनच्या (CDC) अहवालानुसार सिगारेट्स प्यायल्याने शरीराच्या प्रत्येक अवयवाचे नुकसान होते. सिगारेट्सचा धुर केवळ फुप्फुस आणि हार्ट डॅमेज होत नाही तर त्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर अत्यंत वाईटरितीने होत असतो. जे लोक दररोज अनेक सिगारेट्स ओढतात, त्यांच्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी होते. आणि त्यांना अनेक घातक आजारांचा सामना करावा लागतो.सिगारेट्सने कॅन्सर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे आजाराचा धोका कैक पटीने वाढतो.सिगारेट्समध्ये निकोटीन आणि टार सारखे हानिकारक केमिकल्स असतात.जे पेशींना नुकसान पोहचवतात आणि शरीराच्या सामान्य क्रियांना बाधक ठरवतात.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते सिगारेट्सचा धूर सर्वात जास्त फुप्फुसांना प्रभावित करतो. त्यामुळे फप्फुसाशी संबंधीत क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (COPD) होतात आणि फप्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. या आजारामुळे शरीराचे श्वास घेण्याची क्षमतेवर वाईट परिणाम होतो. एवढेच नाही तर स्मोकिंग डायबिटीजचा धोका देखील वाढु शकतो. सिगारेट्स ओढल्याने शरीरातील इंन्सुलिनचा परिणाम कमी होऊ शकतो. ज्यामुळे टाईप 2 डायबिटीजचे रुग्ण होण्याचा धोका वाढतो.

फर्टीलिटी बर्बाद होण्याचा धोका असतो

सिगारेट्स ओढल्याचा परिणाम रिप्रोडक्टिव हेल्थवर देखील वाईटरित्या होतो. स्मोकिंगमुळे महिला आणि पुरुष दोघांनाही फर्टीलिटी बर्बाद होण्याचा धोका असतो. स्मोकिंगमुळे पुरुषांचे स्पर्म काऊंट कमी होऊ शकते आणि महिलांमध्ये हार्मोन असंतुलन होऊ शकतो. सिगारेट्स प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता कमजोर होऊ शकते. स्मोकिंगने डोळ्यांचे आजार वाढतात. त्याशिवाय स्मोकिंग रूमेटॉइड अर्थरायटिस सारख्या ऑटोइम्यून आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे या सर्वांमुळे आयुर्मानाचा दर्जा घसरतो लोक वयाआधीच म्हातारे दिसू लागतात.