Cold Feet Problem : तुमचेही पाय वारंवार थंड पडतात का ? असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण

| Updated on: Jan 24, 2023 | 3:06 PM

हिवाळ्यात हात-पाय गार पडणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु सतत शूज, मोजे आणि हातमोजे घातल्यानंतरही तुमचे पाय थंड राहत असतील तर ते काही गंभीर समस्यांचे कारण असू शकते.

Cold Feet Problem : तुमचेही पाय वारंवार थंड पडतात का ? असू शकते या आजाराचे लक्षण
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – हिवाळ्यात अनेकदा गार वाऱ्यामुळे लोकांचे हातपाय थंड (cold hands and feet) राहतात. या हंगामात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा अवलंब करतात. अनेक लोकं हात आणि पाय उबदार (to be warm) ठेवण्यासाठी मोजे आणि हातमोजे वापरतात. पण काही लोक असे असतात ज्यांचे पाय सतत थंड राहतात. उबदार कपडे घातल्यानंतरही तुमचे पाय बर्फासारखे थंड (cold feet) राहिल्यास ते अनेक गंभीर आजारांचे कारण असू शकते. हिवाळ्यात तुमचे पाय वारंवार थंड पडत असतील तर ते या आजारांचे लक्षण असू शकते.

मधुमेह

हिवाळ्यात सतत उबदार वातावरणात राहूनही तुमचे पाय थंड राहत असतील तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहिल्यास पाय थंड होण्याची समस्या कायम राहते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हे लक्षण सतत तुमच्या शरीरात जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि एकदा मधुमेहाची चाचणी करून घ्या.

हे सुद्धा वाचा

ॲनिमिया

जर तुम्ही ॲनिमियाचे शिकार असाल आणि तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचे पाय अनेकदा थंड पडू शकतात. याशिवाय शरीरात लोह (आयर्न), व्हिटॅमिन बी12, फोलेटची कमतरता, किडनीचा जुनाट आजार अशा समस्या असल्या तरीही अनेकदा पाय थंड राहू शकतात.

हाय कोलेस्ट्रॉल

पाय सतत थंड राहणे हे देखील हाय कोलेस्ट्रॉलचेही लक्षण असू शकते. खरंतर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू लागली तर त्यामुळे रक्तवाहिन्यां ब्लॉक होतात, ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. रक्तप्रवाह नीट होत नसेल तर त्यामुळेही हात-पाय थंड होण्याची समस्या उद्भवू शकते.

हायपोथायरॉईड

तुम्ही थायरॉईडच्या समस्येने झगडत असलात तरीही तुमचे हात पाय थंड पडू शकतात. थायरॉईड रोगामधील हायपोथायरॉईड आजारामुळे पीडित व्यक्तीचे हात पाय थंड राहतात. या प्रकारच्या थायरॉईडमध्ये शरीर पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही, ज्यामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.

अत्याधिक तणाव

जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ताण-तणावाने त्रस्त असाल तर तुमचे पाय थंड होण्याचा त्रास होऊ शकतो. खरंतर अती तणाव आणि चिंतेमुळे पाय थंड होऊ लागतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याबद्दल जास्त ताण घेत असाल तर तुमचे पाय थंड होऊ शकतात.