AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान, वातावरण उष्ण, पण तुमचे हात-पाय थंड पडताय? दुर्लक्ष करु नका ‘या’ गंभीर आजाराचा धोका, वाचा उपाय

छोटी लक्षणं मोठ्या आणि गंभीर आजाराची प्राथमिक लक्षणं असू शकतात. म्हणूनच अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. असंच एक लक्षण म्हणजे हात-पाय थंड पडणं.

सावधान, वातावरण उष्ण, पण तुमचे हात-पाय थंड पडताय? दुर्लक्ष करु नका 'या' गंभीर आजाराचा धोका, वाचा उपाय
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 6:43 PM
Share

मुंबई : आरोग्य ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण आरोग्य व्यवस्थित असेल, तरच बाकी सर्व गोष्टी करता येतात. मात्र, अनेकदा आपण शरीराच्या काही दुखण्याला किंवा त्रासाकडे दुर्लक्ष करतो. फार काही मोठं नाही, किरकोळ आहे असा विचार करुन आपोआप बरं होईल, असा विचार केला जातो. मात्र, हा विचार काही वेळा अंगलट येण्याची शक्यता असते. ही छोटी लक्षणं मोठ्या आणि गंभीर आजाराची प्राथमिक लक्षणं असू शकतात. म्हणूनच अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. असंच एक लक्षण म्हणजे हात-पाय थंड पडणं (Health alert if your hand and feet are cold in hot temperature then be careful about Anemia).

काही लोकांचे हात-पाय अगदी उन्हाळ्यात देखील थंड पडतात. यावर घरातील ज्येष्ठ त्या व्यक्तीला त्याचं रक्तच थंड असल्यानं हातपाय थंड पडत असल्याचं सांगतात. बहुतांश लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, असं होणं एका गंभीर आजाराचं लक्षण आहे. या रक्ताशी संबंधित आजाराचं नाव ‘अॅनिमिया’ असं आहे.

शरीरात लोह (आयर्न) आणि रक्ताची कमतरता असल्याची लक्षणं

अॅनिमिया रक्ताशी संबंधित आजार आहे. अॅनिमिया झाल्यावर शरीरात आयर्नची कमतरता पडते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे शरीरात रक्ताचं प्रमाणही कमी होतं. ज्येष्ठ डॉक्टर डॉ प्रवीण सिंह चव्हाण यावर म्हणतात, “शरीरात हिमोग्लोबिन कमी झालं की आपल्या शरीरातील धमण्यांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. अशावेळी अॅनिमिया तुमच्या जीवाला धोका तयार करु शकतो.”

अॅनिमियाची कारणं

अॅनिमियाचं सर्वात मोठं कारण शरीरात लोह म्हणजेच आयर्नचं कमी प्रमाण हे आहे. याशिवाय तुम्ही जेवणात कॅल्शियम जास्त प्रमाणात घेत असाल तर ते देखील अॅनिमियाचं एक कारण होऊ शकतं. त्यामुळेच जेवणावर लक्ष देणं गरजेचं असतं. यासाठी जेवणात हिरव्या पालेभाज्या न खाल्यास अॅनिमियाचा धोका वाढतो. शरीरातून जास्त प्रमाणात रक्त वाहून गेल्यासही अॅनिमिया होतो. बहुतांश महिलांना या आजाराचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यायला हवी.

अॅनिमियाची लक्षणं

  • हात-पाय थंड राहणे
  • कायम थकल्यासारखं वाटणं
  • उठताना, बसताना किंवा काम करताना चक्कर येणं
  • त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
  • श्वास घेताना त्रास होणे
  • छातीची धडधड वाढणे

अॅनिमियापासून संरक्षणाचे उपाय

  • आहारात गाजर, टॉमेटो, बीट आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा
  • घरात स्वयंपाक लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करावा
  • हरबरे, गुळ खावा. काळ्या गुळाने शरीरातील हिमोग्‍लोबीनचं प्रमाण वाढतं.
  • लोह (आयर्न) किंवा कॅल्शियमची कमतरता अधिक असल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून तुम्ही गोळ्या देखील सुरू करू शकता.

(नोट : ही बातमी केवळ जागरूकतेसाठी आहे. अॅनिमियाची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

हेही वाचा :

Mustard Oil : ‘मोहरीचे तेल’ सांधेदुखीसह अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी, वाचा!

Drink : हंगाम कोणताही असो ‘हे’ 5 खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक !

Yoga Poses : चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ 5 योगासन नियमित करा!

व्हिडीओ पाहा :

Health alert if your hand and feet are cold in hot temperature then be careful about Anemia

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.