Corona update : वाढलेल्या कोरोना केसेसमुळे दिल्ली पुन्हा निर्बंधांच्या उंबरड्यावर, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड!

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मास्क (Mask) लावण्याची सक्ती केली जाऊ शकते. जर एखाद्या व्यकीने मास्क वापरले नाही तर त्याला 500 रूपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो.

Corona update : वाढलेल्या कोरोना केसेसमुळे दिल्ली पुन्हा निर्बंधांच्या उंबरड्यावर, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड!
दिल्लीमध्ये कोरोनाच्या रू्णांमध्ये मोठी वाढ
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 1:50 PM

मुंबई : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मास्क (Mask) लावण्याची सक्ती केली जाऊ शकते. जर एखाद्या व्यकीने मास्क वापरले नाही तर त्याला 500 रूपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो. कोरोना (Corona) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलली जाऊ शकतात. कारण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सातत्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. यावेळी धोक्याची घंटा म्हणजे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शाळा बंद होणार नाहीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीडीएमएच्या बैठकीत मास्क अनिवार्य करण्यावर शिक्कामोर्तंब झाले आहे. इतकेच नाही तर जे मास्क घालणार नाही, त्यांना 500 रुपयांच्या दंड देखील भरावा लागणार आहे. दिल्ली सरकार कोरोनाच्या वाढलेल्या केसेसमुळे चाचणी आणि लसीकरणावर देखील भर देणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद ठेवल्या जाणार नाहीत, असा निर्णय डीडीएमएच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, शाळांसाठी वेगळा एसओपी जारी केला जाईल. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलण्यावर भर देण्यात येणार आहे.

गेल्या 24 तासांमध्ये इतक्या रूग्णांची भर

दिल्लीमधील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात येथे 26 टक्के कोरोना रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 632 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी सोमवारी 501 प्रकरणे नोंदवली गेली होती. मात्र, मंगळवारी एक दिलासादायक बातमी देखील पुढे आली, पाॅझिटिव्ह दरात घट झाली आहे. सध्या दिल्लीमधील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर! तर 40 रुग्णांचा 24 तासांत मृत्यू

ब्रेकिंग! महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता, केंद्राचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र, पत्रात काय?