Covid 19: पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक… कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगात दहशत, भारतात रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ

Covid 19: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात दहशत माजवली आहे, भारतात रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ, आतापर्यंत किती जणांना लागण, जाणून घ्या कोणता आहे नवा व्हेरियंट...

Covid 19: पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक… कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगात दहशत, भारतात रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ
कोरोना
| Updated on: May 29, 2025 | 7:58 AM

Covid 19: भारत आणि अनेरिकेसह कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात दहशत माजवली आहे. अमेरिकेतील एक रिपोर्टनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल हैराण करणारी माहिती समोर आली आहे. नव्या व्हेरियंटसाठी अमेरिकेतील तज्ज्ञांनी चीनला जबाबदार मानलं आहे. नवा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पुन्हा एकदा कोविड-19 ने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. भारत, अमेरिका, सिंगापूर, जपान, फ्रान्स, स्पेन आणि तैवान सारख्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयाने एक रिपोर्ट जारी केला आणि नव्या व्हेरियंट नाव NB.1.81 म्हणून घोषित केलं आहे. कोरोनाचा नवीन प्रकार मागील सर्व प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आणि जीवघेणा आहे. भारतात या संसर्गाने 1 हजाराहून अधिक लोकांना संसर्गित केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

जगभरात भीती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबद्दल आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि अनेक तज्ज्ञांचा असा दावा आहे की या नवीन व्हेरियंटमागे चीनशिवाय इतर कोणीही नाही. अमेरिकन तज्ज्ञांचा दावा आहे की कोविड-19 चा नवीन प्रकार NB.1.81 प्रथम चीनमध्ये पसरला.

चीनमधून हा व्हायरल आशियाई अनेक देशांमध्ये पसरला. आता ते जगाच्या अनेक भागात पोहोचला आहे. चीन कोरोनाच्या नवीन प्रकाराचा खलनायक आहे ही शंका अधिकच गडद झाली आहे कारण चीन त्याच्याशी संबंधित माहिती लपवत आहे.

चीनच्या शहरांमध्ये देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे… असं देखील सांगितलं जात आहे. मोठ्या संख्येने चिनी लोकांना याचा संसर्ग झाला परंतु जिनपिंग यांनी जगाला याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

सांगायचं झालं तर, चिनी लोकं अनेक देशांमध्ये प्रवास करत असतात. आता देखीन चीनने तेच केलं जे 2020 मध्ये केलं होतं. चीनने जगाला पुन्हा एकदा मोठी महामारी दिली आहे. आता संपूर्ण जगासमोर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटशी सामना करण्याचं मोठं आव्हान आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.