बापरे! म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू; महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये थैमान

| Updated on: May 12, 2021 | 12:33 PM

कोरोनाने आधीच हाहाकार माजवलेला असताना आता म्युकर मायकोसिसच्या आजारानेही थैमान घातले आहे. (Covid-induced mucormycosis cases on rise in Maharashtra)

बापरे! म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू; महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये थैमान
black fungus
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाने आधीच हाहाकार माजवलेला असताना आता म्युकर मायकोसिसच्या आजारानेही थैमान घातले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Covid-induced mucormycosis cases on rise in Maharashtra)

एकट्या महाराष्ट्रातच म्युकर मायकोसिसचे 2 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. आता ज्या रुग्णालयांसोबत मेडिकल कॉलेज अटॅच आहेत, त्या ठिकाणी म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वेगाने वाढतेय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे. त्याच वेगाने म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिस नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपया योजना सुरू केल्या आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. म्युकर मायकोसिसमध्ये एक ब्लॅक फंगस आहे. त्यामुळे 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहेत. म्युकर मायकोसिसच्या लक्षणांमध्ये ब्लॅक फंगस शिवाय डोकेदुखी, ताप, डोळ्यांना होणारा त्रास, नाक दुखणे आणि दृष्टी जाणे आदी लक्षणांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

राजस्थान, गुजरातमध्येही रुग्ण आढळले

महाराष्ट्राशिवाय गुजरातमध्येही म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे लक्षणे आढळून आली आहेत. तर काही रुग्णांच्या दृष्टीवरही परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे गुजरातच्या राजकोटमध्ये या आजारावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करण्यात आले आहे. त्यात स्पेशल वॉर्डही ठेवण्यात आले आहेत.

राजस्थानच्या जयपूरमध्ये या आजाराचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यात ब्लॅक फंगस असल्याचं दिसून आलं आहे. या रुग्णांनाही अंधूक दिसत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाचं संकट असतानाच आता या नव्या आजारामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असून आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. (Covid-induced mucormycosis cases on rise in Maharashtra)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यात कोरोना बळींची संख्या का वाढली?; महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ कारण!

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी

अरे देवा! अमरावतीत म्युकरमायकोसिसचा शिरकाव; प्रशासनात खळबळ

(Covid-induced mucormycosis cases on rise in Maharashtra)