ठाण्यात कोरोना बळींची संख्या का वाढली?; महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ कारण!

मुंबईसह ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. (Many Covid 19 Deaths Being Tagged As Ignore Symptoms, says vipin sharma)

ठाण्यात कोरोना बळींची संख्या का वाढली?; महापालिका आयुक्तांनी दिलं 'हे' कारण!
Dr. VIPIN SHARMA

ठाणे: मुंबईसह ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. लक्षणे दिसूनही वेळेवर कोरोना तपासणी न केल्यामुळे, तसेच पॉझिटिव्ह येऊनही वेळेत रुग्णालयात दाखल न होण्याच्या प्रवृत्तीमुळे ठाण्यातील कोरोना मृतांची संख्या वाढत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं. कोरोनाची थोडीही लक्षणे आढळल्यास हयगय करू नका, तात्काळ रुग्णालयात दाखल व्हा, असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. (Many Covid 19 Deaths Being Tagged As Ignore Symptoms, says vipin sharma)

प्रसारमाध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी हे आवाहन केलं आहे. अनेक कोरोनारुग्ण अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. रुग्णालयात दाखल होतानाच आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या यात अधिक आहे. असे रुग्ण रुग्णालयांमध्ये धाव घेत असले तरी तोवर त्यांची परिस्थिती इतकी बिघडलेली असते की, त्यांचा जीव वाचवणे अशक्य होऊन बसते, असं आयुक्तांनी म्हटलं आहे.

पाच दिवस उशीर झाला आल्याने मृत्यू

महापालिकेने ठाण्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास केला असता हेच रुग्ण किमान पाच दिवस आधी रुग्णालयात दाखल झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा निष्कर्ष काढला आहे. ठाणे जिल्ह्यात आजवर 1776 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या 144 रुग्णांना पहिल्याच दिवशी उपचारादरम्यान प्राण गमवावा लागला आहे. शहरात आजवर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी हे प्रमाण 8.4 टक्के इतके आहे. अत्यवस्थ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर पहिल्या 7 ते 10 दिवस अत्यंत महत्वाचे ठरतात. परंतु, जर रुग्ण प्राथमिक लक्षणे असताना रुग्णालयात दाखल न होता आजार बळावल्यानंतर दाखल झाले तर उपचारांना योग्य प्रतिसाद मिळण्याचे प्रमाणही कमी होते. याच कालावधीत जवळपास 7.8 टक्के म्हणजे शंभरापेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 11.5  टक्के रुग्णांचा मृत्यू हा 15 दिवसांपेक्षा कमी दिवसांतील उपचारांदरम्यान मृत्यू झालेला आहे. 15 दिवसांपेक्षा जास्त उपचार घेतल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.

वेळीच उपचार घ्या

रुग्णांमध्ये घरीच राहून उपचार करण्यास पसंती मिळत असून तब्येत अधिक खालावल्यावर रुग्णालयाकडे धाव घेतली जात आहे. तोवर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याऐवजी वेळीच रुग्णालयात दाखल झाले तर कितीतरी जीव वाचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांनी वेळीच रुग्णालयात दाखल व्हावे, तसेच लक्षणे असतील तर त्वरित चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांनी केले आहे. (Many Covid 19 Deaths Being Tagged As Ignore Symptoms, says vipin sharma)

 

संबंधित बातम्या:

Video: जलनेती केल्यास कोरोना संसर्ग टाळता येतो; नाशिकच्या महापौरांचा प्रात्यक्षिकांसह दावा

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 45 वर्षांच्या पुढील नागरिकांना आज लस, नागरिकांच्या रांगा

(Many Covid 19 Deaths Being Tagged As Ignore Symptoms, says vipin sharma)