हाडांमधून आवाज येतोय… सावधान! आहारात या गोष्टींचा करा समावेश

हाडांमधून आवाज येतोय, सावधान! आहारात या गोष्टींचा करा समावेश(Diet tips for bones)

हाडांमधून आवाज येतोय... सावधान! आहारात या गोष्टींचा करा समावेश
हाडांमधून आवाज येतोय, सावधान!
| Updated on: Feb 07, 2021 | 5:58 PM

मुंबई : दीर्घकाळ काम केल्यानंतर हाडांमधून कट कट असा आवाज ऐकू येतो. जब आपल्यालाही हा आवाज ऐकू येत असेल तर सावधान व्हा. हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. जर तुम्ही दैनंदिन कामात कार्यरत आहात आणि तरीही तुमच्या हाडांमधून कट कट आवाज ऐकू असेल तर तुम्हाला ऑस्टियोपीनिया आजार असू शकतो. या आजारामध्ये हाडे कमजोर होतात. वाढत्या वयात हाडे कमजोर होणे ही सामान्य बाब आहे. मात्र कमी वयातच तुम्हाला अशा त्रासाचा सामना करावा लागला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. हाडांमध्ये गॅप पडला असेल तरी हाडांमधून कट कट असा आवाज येतो. या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. यापासून बचाव करण्यासाठी आहारात कॅल्शिअमचे प्रमाण वाढवा. यामुळे तुमची हाडे मजबूत होतील.(Diet tips for bones)

दूध

जर हाडांमध्ये कमजोरी आली असेल तर अशा गोष्टींचे सेवन करा ज्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असेल. दररोज दूध प्या. दूध कॅल्शिअमचे मुख्य स्त्रोत आहे.

मेथी

हाडे मजबूत करण्यासाठी मेथीचे सेवन केले पाहिजे. दररोज रात्री अर्धा चमचा मेथी पाण्यात भिजत ठेवून सकाळी खा. तुम्ही मेथीचे पाणीही पिऊ शकता. रोज असे केल्याने तुमचे हाडांचे दुखणे कमी होईल आणि हाडे मजबूत होतील.

ड्रायफ्रुट्स खा

बदाम हे सुद्धा कॅल्शिअमचे चांगले स्त्रोत आहे. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अक्रोड खाल्ले पाहिजे. अक्रोडमध्ये ओमगा 3 फॅटी अॅसिड असते, जे हाडांना मजबूत करण्याचे काम करते.

गूळ आणि चणे

चण्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि आयर्नचे प्रमाण भरपूर असते. गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट असते जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी दिवसातून एक वेळ गूळ आणि चणे खाल्ले पाहिजे.

 

इतर बातम्या

कांद्याच्या पातीचे आश्चर्यकारक फायदे !

गौतमी देशपांडेचं हटके फोटोशूट, फोटो पाहाच

 

(Diet tips for bones)