गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात या सीड्स, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा

गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कधी ना कधी होत असते. या समस्येने अनेक लोक त्रस्त होत असतात. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही सीड्स जर सकाळी उपाशी पोटी खाल्ल्या तर या सर्व समस्येतून सुटका मिळते.

गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात या सीड्स, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा
constipation
| Updated on: Sep 01, 2026 | 6:14 PM

आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीचा आहार, जंक फूड आणि खराब जीवनशैलीमुळे पोटाची समस्या अनेकांना होत असते. दर दुसरी व्यक्ती गॅस, एसिडीटी, अपचन आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त असते. जर दीर्घकाळ अंगावर काढले तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. सकाळी पोट साफ न झाल्याने दिवसभर थकवा, चिडचिडेपणा आणि अंग जड वाटते. जर दीर्घकाळ ही समस्या कायम राहिली तर गंभीर आजार होऊ शकतात. अशात डॉक्टर सलीम झैदी यानी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत काही सीड्स संदर्भात माहिती मिळत आहे.

फायबरने भरपूर: चिआ सीड्समध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर भरपूर असते.यामुळे आतड्यांच्या हालचाली होऊन मल त्यागण्यास मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

जेल सारखे टेक्सचर: जेव्हा तुम्ही चिआ सीड्स पाण्यात भिजवता त्या पाण्याला शोषून घेते. ज्यामुळे जेल सारखे स्ट्रेक्चर तयार होते. ही जेल आतड्यांची आतून सफाई आणि मलाला मुलायम बनवण्यास मदत करते.

गट हेल्थमध्ये सुधारणा : या सीड्स आतड्यातील गुड बॅक्टेरियांना प्रोत्साहन बनवतात. ज्यामुळे गॅस, एसिडीटी आणि ब्लोटिंगची समस्या कमी होतात.

वजन घटवण्यास मददगार: चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जेव्हा हे पाण्यात भिजवून तुम्ही सेवन करता तेव्हा हे पोटात जाऊन फुगतात. त्यामुळे दीर्घकाळी पोट भरल्याची जाणीव करुन देतातात. म्हणून वारंवार भूक लागत नाही आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

हार्ट हेल्थसाठी : चिआ सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात आढळते. जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करणे आणि हृदयाला हेल्दी राखण्यास मदत करते.

सुखलेल्या चिआ सीड्स कधी खाऊ नका, एक चमचा चिआ सीड्स रात्रभर ग्लासभर पाण्यात भरु ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी किंवा नारळपाण्यात २० ते ३० मिनिटे भिजवुन ठेवा. जेव्हा ती जेली सारखी होते, तेव्हा याचे सेवन करावे. रिकामी पोटी याचे सेवन करावे. त्यामुळे मल त्यागण्यास मदत होते. आणि गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us