Health : 12 ही महिने सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!

| Updated on: Feb 17, 2022 | 11:10 AM

हवामानातील बदल हे नवे आजार घेउन येत असते. ठरावीक काळामध्ये सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असतो. त्यातच लहान मुलांवर या संधीसाधू आजारांचा सर्वाधिक दुष्परिणाम दिसून येत असतो. लहान मुले आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत असते. त्यामुळे ते लवकर आजारांना बळी पडतात.

Health : 12 ही महिने सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!
सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय फायदेशीर
Follow us on

खोकला, सर्दी आणि ताप यांसह अनेक समस्या हिवाळ्यामध्ये (Winter) निर्माण होतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ताप, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. विशेष म्हणजे काही लोकांना तर हिवाळ्याच नाहीतर 12 ही महिने खोकला आणि सर्दीचा त्रास होतो. यात, लहान मुले आजारी पडण्याचा धोका (Danger) जास्त असतो.

त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत असते. त्यामुळे ते लवकर आजारांना बळी पडतात. विशेषत: संसर्गाचा त्यांच्यावर झपाट्याने परिणाम होतो. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकल्यासारख्या समस्या लहान मुलांना अगदी सहजपणे घेरतात. त्यांच्या संरक्षणासाठी, मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या मुलालाही या ऋतूमध्ये सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर खालील घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.तसेच हे उपाय घरातील ज्येष्ठ व्यक्तीसाठी देखील फायदेशीर आहेत.

-लसणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे लसूण आणि वव्याचा धूर तसेच त्याचा शेक मुलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तव्यावर लसणाच्या दोन ते तीन मोठ्या पाकळ्या आणि काही चिमूटभर ववा टाका. त्यातून धूर निघू लागल्यावर मुलाला त्याचा धूर घेऊ द्या. याच्या वासाने बाळाला खूप आराम मिळेल आणि सर्दी-खोकला लवकर दूर होईल तसेच नाकदेखील मोकळे होईल.

-जर तुमचे बाळ अद्याप दुध पित असेल तर आजारपणात स्तनपान सुरुच ठेवा आईचे दूध मुलांसाठी अमृतासारखे असते. हे त्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करते. आईचे दूध बाळासाठी औषधासारखे काम करते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आईचे दुध सर्वात उपयुक्त ठरत असते. त्यामुळे बाळाला भरपुर प्रमाणात दुध पाजा.

-मोहरीच्या तेलात थोडा ववा आणि लसूण तळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. हे तेल कोमट झाल्यावर बाळाच्या पायाच्या तळव्यावर लावून मसाज करा. त्याच्या छातीवरही तेल लावून नंतर त्याला अंगावर चादर घेउन झोपू द्यावे. रात्री झोपताना केलेला हा उपाय त्याला थंडी व सर्दीपासूनही वाचवेल. सकाळी सर्दी गेलेली असेल.

संबंधित बातम्या : 

मासिक पाळीच्या काळात दही खाताय?, जाणून घ्या फायद्याचे आहे की नुकसानदायक!

Essential Vitamins : ‘ही’ सहा जीवनसत्त्वे शरीरासाठी आहेत आवश्यक; फायदे जाणून घ्या