AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डायरिया’ झाल्यावर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ.. नाहीतर बेतेल जिवावर; जाणून घ्या, ‘अतिसारा’ ची लागण झाल्यास, काय खावे

डायरियाला अतिसार असेही म्हणतात. हा पचनाचा त्रास आहे. अतिसारामध्ये मल पाण्यासारखा पातळ असतो. आरोग्यदायी सकस आहाराने अतिसारापासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या, अतिसार(जुलाब) झाल्यास काय खावे आणि कोणत्या पदार्थापासून दूर राहावे.

‘डायरिया’ झाल्यावर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ.. नाहीतर बेतेल जिवावर; जाणून घ्या, ‘अतिसारा’ ची लागण झाल्यास, काय खावे
| Updated on: Jul 06, 2022 | 6:29 PM
Share

मुंबईः पावसाळा सुरू झाला की, अतिसार (Diarrhea) ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा अतिसार होतो तेव्हा मल खूप पातळ किंवा पाण्यासारखे होते. वारंवार शौचास जावे लागत असल्याने प्रकृती खालावते. अनेक प्रकरणांमध्ये अतिसाराचे कारण कळत नाही. अतिसार अनेक कारणांमुळे होऊ शकतो जसे की, अन्नातून विषबाधा किंवा ऍलर्जी, औषधांच्या सेवनामुळे (Due to drug intake) इत्यादी. जुलाबाची लक्षणे नसली तरी काहीवेळा थकवा, उलट्या, पोटदुखी किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. जुलाबाची समस्या फार कमी काळासाठी असते, जी काही दिवसात स्वतःच बरी होते. पण जर जुलाबाची समस्या अनेक आठवडे राहिली तर ते आतड्याचा आजार किंवा आतड्यांत संसर्ग (Intestinal infections) किंवा सूज असल्याचे सूचित करते. अशा वेळी, आपण आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ अजिबात खाऊ नयेत याबाबत आपल्याला माहिती असायला हवी.

अतिसाराची लक्षणे

अतिसाराची समस्या असल्यास, तुम्हाला पोटदुखी किंवा मुरड येणे, सूज येणे, थकवा, उलट्या होणे, ताप येणे, शौचातून रक्त येणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

 जुलाब झाल्यास या गोष्टींचे सेवन करा

डायरियाची समस्या लवकर दूर होण्यासाठी केळी, भात, सफरचंद आणि ब्रेडचे सेवन करावे. या गोष्टी पचायल्या अगदी हलक्या असतात, ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होत नाही. या सर्व गोष्टी मलामध्ये घट्टपणा आणण्यास मदत करतात.

जास्तीत जास्त पाणी प्या

अतिसाराची लागण झाल्यास, आपण जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहील. पाण्याशिवाय तुम्ही कमी काळा चहा, नारळ पाणी देखील घेऊ शकता. जरा बरे वाटू लागताच तुम्ही अंडी किंवा शिजवलेल्या भाज्यांचे सेवन करू शकता.

जुलाब होत असल्यास याचे सेवन करू नका

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जुलाब होत असताना सेवन करू नयेत. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. काही पदार्थ तुमची समस्या कमी करण्याऐवजी वाढवू शकतात. अशा परिस्थितीत या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे, फॅटी आणि गुळगुळीत पदार्थ, मसालेदार अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, मांस, कच्च्या भाज्या, कांदे, कॉर्न, लिंबूवर्गीय फळे, अल्कोहोल, कॉफी, सोडा, कृत्रिम गोड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

उपचार आणि घरगुती उपाय

अतिसाराची अनेक प्रकरणे अल्पकालीन असतात आणि निरोगी आहार, द्रवपदार्थ आणि औषधे यासारख्या घरगुती उपायांनी बरे होऊ शकतात. कधीकधी कृमी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामुळेही अतिसार होऊ शकतो. या प्रकरणात, प्रतिजैविक(अँटिबायोटिक) औषधांच्या मदतीने बरे केले जाऊ शकते. परंतु, जर तुम्हाला गंभीर अतिसार झाला असेल तर रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे.

डॉक्टरांना कधी भेटायचे

सामान्यतः विश्रांती, सकस आहार आणि औषधांच्या मदतीने अतिसार बरा होऊ शकतो, परंतु जर तुम्हाला ही समस्या 2 दिवसांपेक्षा जास्त काळ भेडसावत असेल आणि तुम्हाला खूप अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. डिहायड्रेशन व्यतिरिक्त, जर तुमच्या शरीरात इतर कोणतीही लक्षणे दिसत असतील तर अशा परिस्थितीत डॉक्टरांना भेटा. जर तुमच्या शौचास रक्त येत असेल किंवा तुम्हाला तीव्र ओटीपोटात दुखत असेल तसेच तुम्हाला तीव्र ताप असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.