AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss: वजन कमी करायचे असेल तर रोज प्या ‘वेलचीचे पाणी’, जाणून घ्या फायदे

जेवणाचा विशेषत: गोड पदार्थांचा स्वाद वाढवायचा असेल तर वेलचीचा वापर केला जातो. मात्र वेलचीच्या मदतीने वजनही कमी करता येते, हे तुम्हाला माहीत आहे का ?

Weight loss: वजन कमी करायचे असेल तर रोज प्या 'वेलचीचे पाणी', जाणून घ्या फायदे
वेलचीचे पाणी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 29, 2022 | 2:37 PM
Share

Cardamom Water To Reduce Belly Fat : वाढत्या कामामुळे आजकाल सर्वांची जीवनशैली (bad lifestyle) बदलली आहे. वेळीअवेळी जेवण, जंक फूडचे सेवन (Junk food), पुरेशी झोप न घेणे, सतत एका जागी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टींचा शरीरावर परिणाम दिसून येतो. वजन तर वाढतेच पण अनेक आजारही शरीराला घेराव घालू लागतात. मग सुटलेले पोट कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळायचा नाहीतर डाएटच्या नावाखाली उपाशी रहायचे, असे प्रकार केले जातात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, पण सर्वांनाच त्यात यश मिळते असे नाही. मात्र घरच्या घरी काही उपाय करून वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. जेवणाचा, चहाचा विशेषत: गोड पदार्थांचा स्वाद वाढवायचा असेल तर वेलचीचा (Cardamom) वापर केला. मात्र त्याच वेलचीच्या मदतीने वजनही (weight loss) कमी करता येऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का ?

गोड पदार्थांमध्ये हमखास वेलचीचा वापर केला जातो. वेलचीच्या सुवासामुळे भूक वाढते, माऊथ फ्रेशनर (मुखवास) म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. त्याशिवाय चांगल्या पचनासाठीही वेलचीच्या सेवनाने मदत होते. वेलचीचा वापर करून वजन कमी कसे करता येते, ते वाचूया .

वजन कमी करायचे असेल तर वाढवा वेलचीचा वापर

हेल्थशॉट्सनुसार, वेलचीमुळे भूक तर वाढतेच पण तिच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढते. ज्यामुळे शरीरावर जमा झालेली चरबी कमी करणे सोपे होते. एवढेच नव्हे तर अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर करण्यासाठीही वेलचीचे सेवन फायदेशीर ठरते. रोज वेलचीचे पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.

असे बनवा वेलचीचे पाणी

5 ते 6 वेलची घेऊन, त्या सोलून त्याचे दाणे बारीक कुटून पूड करून घ्या. आता अंदाजे एक लीटर पाण्यात वेलचीची पूड घालून ते रात्रभर तसेच भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी थोडे गरम करून घ्यावे व ते प्यावे. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यायल्यास शरीरावरील चरबी कमी होऊन, वजन कमी होण्यास मदत होते. मात्र त्यासोबतच तुम्हाला योग्य आहार आणि थोडाफार व्यायाम करण्याचीही गरज आहे.

वेलचीच्या पाण्याचे इतर फायदे –

  1.  बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
  2.  शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  3.  रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  4.  मधुमेहाचा धोका कमी होतो.
  5.  वेलचीचे पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थचे कार्य सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.
  6.  पोटदुखीचा त्रास होत असल्यास वेलचीचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
  7.  वेलचीचे पाणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?