Coffee | दिवसातून इतके कप कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर, मात्र अतिरेक नकोच!

| Updated on: May 08, 2022 | 1:54 PM

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीने हे निष्कर्ष सादर केले आहेत. या अभ्यासात, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बेकर हार्ट इन्स्टिट्यूटमधील ऍरिथमियाचे प्रा डॉ. पीटर किस्टलर आणि संशोधन प्रमुख डॉ. पीटर किस्टलर आणि त्यांच्या टीमने यूके बायोबँक या मोठ्या डेटाबेसमधील डेटाचा वापर केला. यात 5 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्याची माहिती आहे. डॉ पीटर यांच्या मते कॉफीमुळे हृदय गती वाढू शकते.

Coffee | दिवसातून इतके कप कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर, मात्र अतिरेक नकोच!
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. विशेष म्हणजे दिवसभरामध्ये किती कप काॅफी पिणे होते हे आपल्याच समजत नाही. 1 कप स्ट्रॉंग कॉफी प्यायल्यानंतर शरीरात ताजेपणा येतो. अनेकांना दिवसाची सुरुवात 1 कप स्ट्रॉंग कॉफीने करायला आवडते, तर काही लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी कॉफी पितात. यामुळेच काॅफीच्या किंमती जास्त असल्यातरीही त्याची मागणी कमी नसून दिवसेंदिवस कॉफीची मागणी सातत्याने वाढते आहे. कॉफीची वाढती लोकप्रियता पाहता 3 संशोधने (Research) करण्यात आली होती. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, कॉफी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. संशोधनात असेही म्हटंले गेले आहे की कॅफिनमुळे हृदयरोग, हृदय गती समस्या किंवा कोणत्याही कारणामुळे मृत्यू होण्याचा धोका15 टक्क्यांनी कमी होतो. पण यासाठी किती कप कॉफी आपण दररोजच्या आहारामध्ये (Diet) घ्यायला हवी हे देखील खूप जास्त महत्वाचे आहे.

पाहा संधोधन काय म्हणते…

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीने हे निष्कर्ष सादर केले आहेत. या अभ्यासात, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बेकर हार्ट इन्स्टिट्यूटमधील ऍरिथमियाचे प्रा डॉ. पीटर किस्टलर आणि संशोधन प्रमुख डॉ. पीटर किस्टलर आणि त्यांच्या टीमने यूके बायोबँक या मोठ्या डेटाबेसमधील डेटाचा वापर केला. यात 5 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्याची माहिती आहे. डॉ पीटर यांच्या मते कॉफीमुळे हृदय गती वाढू शकते. काही लोकांना काळजी वाटते की ते प्यायल्याने काही हृदय समस्या उद्भवू शकतात. परंतु डेटा असे सूचित करतो की कॉफी हा रुग्ण आणि हृदयविकार असलेल्या सामान्य लोकांसाठी निरोगी आहे. कॉफी पिण्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो.

दिवसातून इतके कप कॉफी पिणे फायदेशीर

आहारतज्ज्ञ कॅरेन चोंग यांच्या मते, संशोधनाचे निष्कर्ष जाणून घेतल्यानंतर कॉफी पिणाऱ्यांनी आहारातील कॉफीचे प्रमाण जास्त करू नये. कॅरेन यांच्या म्हणण्यानुसार एका दिवसात दोन किंवा तीन कप कॉफी पिणे सुरक्षित आहे. दोन ते तीन कप कॉफीमध्ये सुमारे 200 मिलीग्राम कॅफिन असते. कॅरेन चोंग म्हणतात की यूएस अन्न आणि औषध प्रशासन देखील दररोज 400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनची शिफारस करत नाही. जर तुम्ही दिवसातून चार कपपेक्षा जास्त प्यायले तर तुम्ही डिकॅफिनेटेड कॉफी प्या. त्यात कॅफिनेटेड कॉफीपेक्षा 97 टक्के कमी कॅफिन असते. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.