पावसाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन करा आवर्जून!

या दरम्यान सर्दी, ताप यासारख्या समस्याही उद्भवू लागतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट करणं खूप गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही आहारात काही मसाल्यांचा समावेश करू शकता का? होय, काही मसाल्यांचे सेवन करून तुम्ही रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. हे मसाले पावसाळ्यात आवर्जून खा.

पावसाळ्यात या मसाल्यांचे सेवन करा आवर्जून!
Spices
| Updated on: Jul 19, 2023 | 2:09 PM

मुंबई: पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याची भीती असते. त्याचबरोबर बदलत्या ऋतूत रोगप्रतिकारशक्ती बळकट करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या ऋतूत शरीर अनेक आजारांना बळी पडू लागते. या दरम्यान सर्दी, ताप यासारख्या समस्याही उद्भवू लागतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट करणं खूप गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही आहारात काही मसाल्यांचा समावेश करू शकता का? होय, काही मसाल्यांचे सेवन करून तुम्ही रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. हे मसाले पावसाळ्यात आवर्जून खा.

काळी मिरी

काळी मिरी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. इतकंच नाही तर काळ्या मिरीचं सेवन केल्यास ते मेटाबॉलिझमही वाढवतं, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. दुसरीकडे जर तुम्हाला खोकला किंवा घसा खवखवण्याची तक्रार असेल तर तुम्ही काळी मिरीचे सेवन करू शकता. याचे सेवन करण्यासाठी झोपण्यापूर्वी कोमट दुधात काळी मिरी पावडर मिसळून प्यावे.

हळद

हळद हा एक असा मसाला आहे जो प्रत्येक घरात असतो. त्याचबरोबर हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचविण्यास मदत करतात हे देखील आपल्याला माहित असेल. त्यामुळे रोज रात्री हळदीचे दूध प्यावे. असे केल्याने तुमची प्रतिकारशक्ती जबरदस्त होते.

लवंग

लवंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडेंट, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. त्याचबरोबर पावसाळ्यात लवंगाचे सेवन केल्यास घसा खवखवण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)