AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपताना इयरबड्स वापरता का? तोटे वाचा

जर तुम्हीही असं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अधूनमधून इयरबड्स घालून झोपायला काहीच हरकत नाही, पण जर तुम्ही रोज असं केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

रात्री झोपताना इयरबड्स वापरता का? तोटे वाचा
using earbuds while sleepingImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 19, 2023 | 1:56 PM
Share

मुंबई: आजकाल बहुतेक लोक इयरबड्स घालून झोपतात. मोबाईल फोनचा वापर करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अधूनमधून इयरबड्स घालून झोपायला काहीच हरकत नाही, पण जर तुम्ही रोज असं केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

रात्री इयरबड्स लावून झोपण्याचे तोटे

ऐकू कमी यायला लागतं

जर एखादी व्यक्ती रात्रभर कानात इयरबड्स लावून गाणी ऐकत असेल तर त्याचा त्याच्या कानांच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती दररोज असे करत असेल तर कान दुखण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हीही रोज कानात इयरबड्स घालून झोपत असाल तर सावध गिरी बाळगा.

बीप असा आवाज कानात ऐकू येतो

आजकाल बहुतेक लोक गॅजेट्स वापरतात पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवण्याचंही काम करतात. त्याचबरोबर अनेक जण घराबाहेर पडताच इयरबड्सच्या माध्यमातून गाणी ऐकतात, पण तसे केल्याने तुमचा ताण वाढतो. कानात सतत इयरबड्स घातले तर बीप असा आवाज कानात ऐकू येतो. या समस्येवर कोणताही इलाज नाही.

कानात मळ साचतो

ही एक नैसर्गिक समस्या आहे. परंतु जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ इयरबड्स वापरत असेल तर यामुळे कानाचा मळ आतल्या दिशेने सरकू शकते, जे कानासाठी हानिकारक ठरू शकते. इतकंच नाही तर इयरबड्समुळे तुम्हाला खाज येणे आणि कोरडेपणा येऊ शकतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
या, चर्चा करू म्हणत कांदा आंदोलनकर्त्यांना वळसे पाटलांचा खुलं आवाहन!
या, चर्चा करू म्हणत कांदा आंदोलनकर्त्यांना वळसे पाटलांचा खुलं आवाहन!.
लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र?; सुळेंनी सरकारला पाडलं तोंडघशी
लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र?; सुळेंनी सरकारला पाडलं तोंडघशी.
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.