
Best Protein Source : प्रोटीन आपल्या शरीराच्या विकासासाठी सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. प्रोटीन शारीरिक विकासासोबत मसल्स वाढवणे आणि रिकव्हरी करण्यासाठी आवश्यक आहे. अशात प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी लोक चिकन, अंडी आणि पनीरचे सेवन करतात. परंतू अनेक लोक कन्फ्युज असतात की प्रोटीनसाठी काय खाणे योग्य ठरेल. आजच्या स्टोरीत आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूयात….
चिकनचा विचार करताना प्रोटीनसाठी चिकन ब्रेस्टला उत्तम मानले जाते. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 165 कॅलरी असते. आणि 31-32 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय 3.5 ग्रॅम फॅट असते. यात कार्ब्स अजिबात नसते.
समजा 100 ग्रॅम पनीर घेतले तर यात 265 ते 300 कॅलरी असते. आणि प्रोटीनचा विचार केला तर यात 18 ग्रॅम प्रोटीन असते. तर 20-21 ग्रॅम फॅट आणि 1-2 ग्रॅम कार्ब्स असते. पनीरमध्ये हळू पचणारे प्रोटीन असते. जे हळूहळू शरीरात रिलीज होतो. त्यामुळे बराच काळ पोट भरलेले वाटते. त्यामुळे पनीर खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत देखील मिळते.एवढेच नाही तर पनीरमध्ये हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम देखील असते. जे मसल्स आणि हाडांना रिकव्हरीत मदत करते.
जिममध्ये जाणारे बहुतांशी लोक प्रोटीनसाठी अंड्यांना प्राधान्य देतात. त्याचे सर्वात मोठे कारण अंड्यात हाय क्वॉलीटीचे प्रोटीन असते. तज्ज्ञ लोक याला गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन म्हणतात. पोषक तत्वांचा विचार करत 2 मोठ्या अंड्यात ( जी सुमारे 100 ग्रॅमची असतील ) सुमारे 155 कॅलरी असते. यात 13 ग्रॅम प्रोटीन असते. आणि 1.1 ग्रॅम कार्ब्स असतात. अंड्यातील हाय क्वॉलीटी प्रोटीनला शरीर चांगल्या प्रकारे शोषून घेते. अंड्यात हाय क्वॉलिटी प्रोटीन शिवाय विटामिन डी आणि विटामिन बी- 12 असते.
जर तुम्ही शाकाहारी आहात तर तुमच्यासाठी पनीर चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्ही वजन वाढवत असाल किंवा कमी करत असाल कर बराच काळ पोट भरलेले आणि एनर्जी मिळवू इच्छीत असाल तर पनीरचे सेवन करु शकता.
अंड्यांचा विचार करता लहान मुलांपासून जिम जाणारे आणि बुजुर्ग लोक अशा प्रत्येकासाठी अंडी प्रोटीनचा सर्वात चांगला सोर्स आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण यात प्रोटीन अधिक असते. अनेक रिपोर्टनुसार बॅलन्स न्युट्रीशन हवे असेल तर चिकन आणि पनीर हाय प्रोटीनचा सोर्स आहे. अंड्याचे प्रोटीन हाय क्वॉलिटीचे असते. त्याचे शरीरात शोषण चांगले होते. जर तुम्हाला मसल्स वाढवायचे असतील आणि रिकव्हरी करायची असेल तर अंड्यांची निवड करा. प्रोटीनसाठी कोणतीही एक पदार्थ बेस्ट असू शकत नाही. हा तुमचा डाएट प्लान आणि एकूणच तुमच्या लाईफस्टाईलवर अवलंबून आहे.