Health | कॉफीच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात हे आजार, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

| Updated on: May 21, 2022 | 12:59 PM

कॉफीमुळे एंडोमेट्रियल कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, मेलेनोमा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. यामुळे काॅफी पिण्याचा अतिरेक टाळाच. बऱ्याच लोकांना आॅफिसमध्ये आणि आॅफिसच्या बाहेरही ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, जर आपल्याला कॅन्सरपासून दूर राहिचे असेल तर कॉफीचे अतिसेवन नका करू.

Health | कॉफीच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात हे आजार, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : कॅन्सरच्या (Cancer) रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे कॅन्सरबद्दलची जागरूकता आता वाढली आहे. आपल्यापैकी अनेकांना कामाच्या ठिकाणी वारंवार ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक चहाऐवजी कॉफी पिण्यावर भर देतात. कॉफीच्या (Coffee) अतिसेवनामुळे अस्वस्थता, निद्रानाश, चक्कर येणे आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये असलेले पॉलीफेनॉल कॅन्सर आणि इतर रोगांचा धोका वाढवतात. तसेच कॉफीच्या अतिसेवनामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाची (Blood pressure) समस्या देखील भेडसावू शकते.

कॅन्सर होण्याची शक्यता

कॉफीमुळे एंडोमेट्रियल कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, मेलेनोमा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. यामुळे काॅफी पिण्याचा अतिरेक टाळाच. बऱ्याच लोकांना आॅफिसमध्ये आणि आॅफिसच्या बाहेरही ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, जर आपल्याला कॅन्सरपासून दूर राहिचे असेल तर कॉफीचे अतिसेवन नका करू. रात्रीच्या वेळी जर कॉफी पिली तर झोपेची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

किडनी स्टोनची समस्या

कॉफी पिण्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. कॉफीमध्ये आढळणारे ऑक्सॅलेट्स रक्तातील कॅल्शियमबरोबर मिसळून कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात, जे मूत्रपिंडातील खड्यांचे अर्थात ‘किडनी स्टोन’च्या समस्येचे मुख्य कारण असू शकते. जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन आपल्या पाचन तंत्रावर गंभीर परिणाम करते. कॅफिनमुळे बर्‍याच लोकांना बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून कॉफीऐवजी हर्बल चहा किंवा ग्रीन टी पिऊ शकता.