ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर ठरू शकतो आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या ऑलिव्ह ऑइल वापरण्याचे योग्य प्रमाण

अनेक जण स्वयंपाक करताना ऑलिव्ह ऑइल वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी जास्त प्रमाणात वापरले तर ते हानिकारक ठरू शकते. ऑलिव्ह ऑइल रोज किती प्रमाणात वापरायचे ते तज्ञांकडून जाणून घेऊ.

ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर ठरू शकतो आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या ऑलिव्ह ऑइल वापरण्याचे योग्य प्रमाण
olive oil
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:22 PM

ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे शरीरासाठी चांगले मानले जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की ते मोठ्या प्रमाणात वापरले जावे. ऑलिव्ह ऑईलचा जास्त वापर केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की ऑलिव्ह ऑइल जितके फायदेशीर आहे तितकेच ते हानिकारकही असू शकते. यामुळे वजन वाढू शकते अ‍ॅलर्जी होऊ शकते आणि पचना संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ऑलिव्ह ऑइलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या हानी बद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.

वजन वाढणे

ऑलिव्ह ऑइल मध्ये इतर स्वयंपाकाच्या तेलापेक्षा जास्त कॅलरीज असतात. 15 ml ऑलिव्ह ऑइल मध्ये सुमारे 120 कॅलरीज असतात. जर ते जास्त प्रमाणात वापरले गेले तर वजन वाढण्याचा धोका असू शकतो. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर ते मर्यादित प्रमाणातच वापरा.

पचरासंबंधित समस्या

ऑलिव्ह ऑइलच्या अतिसेवनामुळे पचनसंस्थेवरही परिणाम होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑइलचा वापर केला तर ते तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव टाकू शकते. त्यामुळे अपचन, गॅस किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अ‍ॅलर्जीची समस्या

तज्ञांच्या म्हणण्यानुसार काही लोकांना ऑलिव्ह ऑईलची अ‍ॅलर्जी असू शकते. त्याच्या अति सेवनामुळे खाज सुटणे आणि पुरळ उठू शकते. जर तुम्ही पहिल्यांदा ऑलिव्ह ऑइल वापरत असाल तर ते कमी प्रमाणात वापरा.

ऑलिव्ह ऑइल कसे वापरावे?

रोज एक किंवा दोन चमचे ऑलिव्ह ऑइल वापरता येईल असे आहार तज्ञ सांगतात. हे सॅलड, भाज्या किंवा सूप मध्ये टाकून तुम्ही वापरू शकता. लक्षात ठेवा की ऑलिव्ह ऑईलचा वापर तळण्यासाठी करू नका. त्याचवेळी जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करा