AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण

मुंबईसह देशभरात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराने कहर निर्माण केला आहे. मुंबईत तर म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांना डोळे गमवावे लागले आहेत. (Black Fungus)

म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण
black fungus
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 10:35 AM
Share

मुंबई: मुंबईसह देशभरात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराने कहर निर्माण केला आहे. मुंबईत तर म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांना डोळे गमवावे लागले आहेत. तर एका मुलीला डायबेटिसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Eyes Of 3 Children Infected With Black Fungus Removed In Mumbai)

मुंबईतील खासगी रुग्णालयातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डोळे गमावलेले तिन्ही मुले 4, 6 आणि 14 वर्षाचे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 4 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये डायबेटिसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, 14 वर्षावरील मुलाला डायबेटिसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्याशिवाय एक 16 वर्षाची मुलगीही आहे. तिलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर तिला डायबेटिस झाला. तिच्या पोटात ब्लॅक फंगस आढळून आला होता.

सुदैवाने डोक्यापर्यंत इन्फेक्शन गेलं नाही

या वर्षी आमच्याकडे दोन ब्लॅक फंगसच्या केसेस आल्या होत्या. दोन्ही मुले अल्पवयीन होते. 14 वर्षाच्या मुलीला डायबेटिस झाली होती. तिची प्रकृती ठिक नव्हती. रुग्णालयात भरती झाल्यानंतर 48 तासात या मुलीमध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे दिसून आली, असं मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टर जेसल सेठ यांनी सांगितले. सेठ यांनी आज तकशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार या मुलीचे डोळे काढण्यात आले. त्यानंतर सहा आठवडे तिची देखभाल करण्यात आली. सुदैवाने तिच्या डोक्यापर्यंत इन्फेक्शन पोहोचले नाही. मात्र, तिला डोळे गमवावे लागले.

जीव वाचवणं कठिण होतं

16 वर्षाच्या मुलीमध्ये डायबेटिसची लक्षणे नव्हती. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर तिच्यामध्ये लक्षणे आढळून आली. ब्लॅक फंगस तिच्या पोटापर्यंत गेला होता. मात्र, नंतर ती बरी झाली. तर, 4 आणि 6 वर्षाच्या या दोन मुलांवर इतर खासगी रुग्णालयात उपचार झाला. या रुग्णालयाच्या मते या दोन्ही मुलांचे डोळे काढले नसते तर त्यांचा जीव वाचवणं कठिण होतं. दरम्यान, देशभरात ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसचा कहर वाढला आहे. या आजाराची शेकडो लोकांना लागण होत आहे. त्यामुळे काहींना डोळे तर काहींना नाक गमवावं लागलं आहे. (Eyes Of 3 Children Infected With Black Fungus Removed In Mumbai)

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींचा आकडा 1600 च्या खाली

Maharashtra Coronavirus LIVE Update : देशात 73 दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये 8 लाखांची घट

Novovax Vaccine | लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायलला सीरमच्या नोव्हवॅक्सला लसीला परवानगी

(Eyes Of 3 Children Infected With Black Fungus Removed In Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.